19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या 13 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांच्या संघाचा फलंदाज सुरेश रैना या आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. याबद्दल सीएसकेने ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे सीइओ केएस विश्वनाथन यांनी सांगितले आहे की सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला असून तो या आयपीेएल हंगामासाठी उपलब्ध नसेल. चेन्नई सुपर किंग्स सुरेश रैनाला आणि त्याच्या कुटुंबाला या वेळेत पूर्ण पाठिंबा देईल.
Suresh Raina has returned to India for personal reasons and will be unavailable for the remainder of the IPL season. Chennai Super Kings offers complete support to Suresh and his family during this time.
KS Viswanathan
CEO— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 29, 2020
सुरेश रैना 2008 पासून प्रत्येक आयपीएल हंगामात आत्तापर्यंत खेळला आहे. त्यामुळे हा पहिलाच असा हंगाम असेल ज्यात तो खेळणार नाही. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचाही खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 193 सामन्यात खेळताना 33.34 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत.
रैनाने याआधी काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.