आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केला गेला आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने त्याचा १४ सप्टेंबरला वाढदिवस सादरा केला. तो नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून यूएईमध्ये दाखल झाला आणि तो सध्या आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी विलगीकरणात आहे. त्याने त्याचा यावर्षीचा वाढदिवस विलगीकरणामध्येच त्याची पत्नी देविशा शेट्टी हिच्यासोबत साजरा केल. सूर्यकुमाला त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुबई इंडियन्स संघानेही त्याला शुभेच्छा दिल्या.
मुंबई इंडियन्सने संघाचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या हाॅटेल रूममध्ये केक पाठवला असून सूर्यकुमार आणि देविशा यांचा केक कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सूर्या भाऊचा वाढदिवस आणि केक नाही? अशक्य.” तसेच मुंबईने या दोघांच्या जोडीचा एक फोटोही शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “क्वारंटाइन वाढदिवसाची गोष्टच वेगळी आहे.”
सूर्या भाऊचा birthday and no cake? Impossible! 🎂💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #KhelTakaTak @surya_14kumar @MXTakaTak MI TV pic.twitter.com/KzzwiIk6yu
— Mumbai Indians (@mipaltan) September 14, 2021
Quarantine birthday की बात ही कुछ अलग है 🎂👌#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @surya_14kumar pic.twitter.com/lctM1tPcuH
— Mumbai Indians (@mipaltan) September 14, 2021
सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा यांचे लग्न ७ जुलै २०१६ मध्ये झाले आहे. देविशाने तिच्या पतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
तिने दोघांचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या आयुष्याच्या प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्या असण्यासाठी आभार आणि प्रत्येक गोष्टीसाठी आभार. मी या नात्यासाठी आभारी आहे, जे १० वर्षांपासून चालत आले आहे. हे नातं राॅ, रियल, ट्रान्सपरंट आणि प्रेमाने भरलेले आहे. आम्ही एकमेकांचे बेस्ट क्रिटिक आहोत आणि गरज पडल्यावर आम्ही एकमेकांना रिएलिटी चेकही देतो. मला ही गोष्ट आवडते की, आम्ही आमच्या डोक्यात चाललेली प्रत्येक गोष्ट मत न बनवता आणि भीतीशिवाय एकमेकांना सांगू शकतो. खूप प्रेम.”
https://www.instagram.com/p/CTy-Q4gAJY6/
सूर्यकुमारने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १०८ आयपीएल सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने २१९७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट १३५.२८ चा होता. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात त्याने सात सामने खेळले असून यामध्ये १७३ धावा केल्या. यामध्ये त्याने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मायदेशात श्रीलंकेवर ओढावली व्हाईटवॉशची नामुष्की; दक्षिण आफ्रिकेने जिंकली ३-० ने टी२० मालिका
मुंबई आणि चेन्नई यांच्यात रंगेल आयपीएल २०२१ चा अंतिम सामना, पाहा कोणी केलंय भाकीत?
महिला फिरकीपटूच्या ‘जादुई स्पिन’ने काही कळायच्या आतच फलंदाज बोल्ड, व्हिडिओ पाहून आठवेल शेन वॉर्न