सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू आहे. मुंबई, पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि बंगाल या संघांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावत शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात स्थान मिळवले. दुसरीकडे, दिल्ली, विदर्भ हे संघ उपउपांत्यपूर्व सामन्यात भिडतील. उपांत्यपूर्व सामने 1 नोव्हेंबरपासून खेळले जातील. दुसरीकडे, उपउपांत्यपूर्व सामने 30 ऑक्टोबर रोजी पार पडतील.
उत्तराखंडचा सलामी फलंदाज अवनीश सुधा याने 96 धावा कुटूनही मुंबईच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन करत आपल्या संघाला दोन धावांनी विजय मिळवून दिला. दुसरीकडे, मुंबईचे अ गटातील सर्वाधिक 24 गुण घेत थेट उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश केला. विदर्भ संघ दुसऱ्या स्थानी राहिला आणि आता त्यांना उपउपांत्यपूर्व सामन्यात खेळावे लागेल.
जयपूरमध्ये ब गटाच्या सामन्यात पंजाबने शुबमन गिलच्या नाबाद 57 धावा आणि प्रभसिमरन सिंग याच्या नाबाद 80 धावांच्या मदतीने उत्तर प्रदेशला 9 विकेट्सने पराभूत केले. या मोठ्या विजयाने पंजाबने दिल्लीला नेट रनरेटमध्ये मागे सोडत अव्वल स्थान पटकावले. दिल्लीला आता उपउपांत्यपूर्व सामने खेळावे लागतील. दिल्लीने नीतिश राणाच्या अष्टपैलू प्रदर्शनाने त्रिपुराला 6 विकेट्सने पराभूत केले. राणाने 3 विकेट्स घेण्याव्यतिरिक्त 61 धावांची वादळी खेळीही केली.
मोहालीमध्ये मध्यम गती गोलंदाज आकिब नबी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हॅट्रिक घेणारा जम्मू काश्मिरचा पहिला गोलंदाज बनला. मात्र, त्याच्या संघाला क गटाच्या या सामन्यात सेनाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. अ गटात राजस्थानने मिझोरमला 73 धावांनी पराभूत केले, तसेच, आणखी एका सामन्यात आसामने मध्यप्रदेशला पाच विकेट्सने पराभूत केले. विदर्भने रेल्वे संघाला 6 विकेट्सने पराभूत केले.
ब गटात हैदराबादने मणिपूरला 10 विकेट्सने पराभूत केले, तर गोवाने पुद्दुचेरीला 88 धावांनी बाद करत 6 विकेट्सने सामना जिंकला. यादरम्यान क गटात महाराष्ट्र संघाने अरुणाचल प्रदेशला 63 धावांनी, तर कर्नाटकने हरियाणाला 5 विकेट्सने पराभूत केले. आणखी एका सामन्यात केरळने मेघालयाला 5 विकेट्सने पराभूत केले. ड गटात हिमाचल प्रदेशने नागालँडला 9 विकेट्सने, बडोदाने आंध्रप्रदेशला 11 धावांनी आणि गुजरातने बिहारला 4 विकेट्सने पराभूत केले.
ड गटात झारखंडने सिक्कीमला 10 विकेट्सने, छत्तीसगडने ओडिसाला 87 धावांनी आणि चंदीगडने बंगालला 8 विकेट्सने पराभूत केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, यष्टीरक्षक म्हणून डीकेची संघात एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन
रिझवान खेळणार 40 ओव्हर? भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल तोंडाला येईल ते बोलला ‘मारो मुझे मारो’ कॉमेडियन