टी-२० विश्वचषका २०२१च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्कारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वार्नर याने या सामन्यादरम्यान एका दोन टप्पी चेंडूवर षटकार मारला होता. यासाठी वॉर्नरला भारतात ट्रोल केले जात आहे. पण पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सलमान बट यांनी मात्र वार्नरचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते वार्नरमध्ये सामन्याप्रती सतर्कता होती आणि त्या चेंडूवर त्याने षटकार मारून अगदी योग्य केले आहे.
उपांत्य सामन्यादरम्यान पाकिस्तानचा मोहम्मद हफीज गोलंदाजीसाठी आला होता. या षटकात गोलंदाजी करतेवेळी एक चेंडू त्याच्या हातातून घसरला आणि दोन टप्पे पडून फलंदाजी करणाऱ्या वार्नरजवळ गेला. वार्नरने हा चेंडू जोरात मारला आणि सीमारेषेबाहेर पाठवला. वार्नरने हा चेंडू सीमारेषेबाहेर मारला असला, तरी सोशल मीडियावर त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत. भारताचा दिग्गज गौतम गंभीरनेही वार्नरवर या घटनेनंतर निशाणा साधला होता.
पाकिस्तानचा या सामन्यात पराभव झाला असला तरीही त्यांचा माजी कर्णधार सलमान बटने वॉर्नरने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते वार्नरने नियमांचे पालन करून हा शॉट खेळला आहे. ते त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले की, “वार्नरने जो सावधानपणा दाखवला, त्यासाठी त्याला पूर्ण श्रेय जाते. त्याला माहित होते की हा नो बॉल आहे आणि त्यामुळेच त्याने याचा पूर्ण उपयोग करून घेतला. वार्नरला नियमांच्या बाबतीत आधीपासूनच सर्वकाही माहीत होते.”
तत्पूर्वी भारताचा दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने वार्नरने मारलेल्या या षटकारानंतर त्याच्यावर निशाना साधला होता. गंभीरने ट्वीट करून म्हटेल होते की, “वॉर्नरने काय दयनीय प्रदर्शन केले आहे.” गंभीरने या ट्वीटमध्ये रविचंद्रन अश्विनला टॅग केले होते. अश्विनला या पोस्टमध्ये टॅग करण्यामागे एक महत्वाचे कारण आहे. यापूर्वी मंकडिंग प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अश्विनला चांगलेच ट्रोल केले होते. त्यामुळेच अश्विनने गंभीरच्या या ट्वीटला प्रतिक्रिया देण्यासाठी त्याने अश्विनला टॅगे केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिलेवहिले टी२० विश्वचषक जेतेपद जिंकण्यासाठी विल्यम्सनने कसली कंबर, बनवली ‘ही’ जबरदस्त रणनिती
“आपण टी२० क्रिकेटमध्ये इतरांच्या तुलनेत खूप मागे”; भारतीय खेळाडूचा टीम इंडियाला घरचा आहेर
न्यूझीलंडविरुद्ध एवढ्या सलामीवीरांचे करणार काय ? भारतीय दिग्गजाने विचारला प्रश्न