चेन्नई। शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून भारताने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. त्यामुळे मागील आकडेवारीला पाहता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा विजय होणे जवळपास ठरल्यात जमा आहे.
भारतीय संघाने यापुर्वी घरच्या मैदानावर ८३ कसोटी सामन्यांतील पहिल्या डावात ३०० पार धावा केल्या आहेत. त्यातील तब्बल ३६ सामने भारताने जिंकले आहेत. तर अवघ्या ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. उर्वरित ४३ सामन्यांचा निकाल लागला नाही अर्थातच ते सामने अनिर्णीत राहिले आहेत.
तसेच मायभूमीत झालेल्या शेवटच्या १२ कसोटी सामन्यांतील पहिल्या डावात ३०० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर भारताने एकदाही पराभवाची चव चाखलेली नाही. यातील ११ सामन्यात त्यांनी विजयी पताका झळकावली आहे. तर १ सामना अनिर्णित सुटला होता. यादरम्यान भारताने दक्षिण आफ्रिका संघाला सर्वाधिक ४ वेळा पराभूत केले आहे. तर न्यूझीलंडला ३ वेळा आणि इंग्लंड, बांग्लादेश, अफगानिस्तान व वेस्ट इंडिजला प्रत्येकी १ वेळा पराभूत केले आहे. श्रीलंकाविरुद्धचा एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे.
चेन्नईत ३०० हून अधिक धावा केल्यानंतर एकदाही हारला नाही भारत
हेच चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यांमधील भारताची आकडेवारी खूप शानदार राहिली आहे. आजवर भारताने चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यातील ४ सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यापैकी २ सामने (१९९३, १९८२ साली) इंंग्लंडविरुद्ध झाले होते. तर उरलेले २ सामने (१९६७, १९८८) वेस्ट इंडिजविरुद्ध झाले होते. यातील २ सामने भारताने आपल्या नावावर केले होते. तर २ सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते.
थोडक्यात सांगायचे झाले तर, चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात ३०० हून अधिक धावा केल्यानंतर भारताचा पराभव जवळपास अशक्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: जेव्हा मुंबईकर रोहित शर्मा बोलू लागतो मराठी, पाहा तो दुर्मिळ क्षण
पती नंबर १..! पत्नीच्या बोटांमध्ये वेदना होत असल्याने रोहितने ‘असा’ केला उपचार, पाहा तो प्रेमळ क्षण
ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची जबाबदारी, ‘असा’ आहे २० जणांचा संघ