इंडियन प्रीमियर लीगच्या २७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला धूळ चारत ४ गडी राखून विजय मिळवला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिलेल्या २१९ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून कायरन पोलार्डने वादळी खेळी करत मुंबई इंडियन्स संघाला सामना जिंकून दिला होता. तसेच या सामन्यात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आपला संघ सहकारी कृणाल पंड्यावर नाराज होताना दिसून आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू, कृणाल पंड्या अनेकदा आपल्या संघ सहकाऱ्यांवर खराब क्षेत्ररक्षण झाल्यामुळे संताप व्यक्त करताना दिसून आला आहे. परंतु या सामन्यात उलट चित्र पाहायला मिळाले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फाफ डू प्लेसिस आणि मोईन अली हे ताबडतोड फलंदाजी करत होते.
तर झाले असे की, मुंबई संघाकडून ६ वे षटक टाकण्यासाठी रोहित शर्माने ट्रेंट बोल्टला गोलंदाजीला बोलवले होते. याच षटकात टाकलेल्या चेंडूवर फलंदाज मोईन अलीने लेग साईडच्या दिशेने एक शॉट खेळला होता. तो चेंडू वेगाने सिमारेषेच्या दिशेने गेला होता. त्या स्थानी क्षेत्ररक्षण करत असलेल्या कृणाल पंड्याला तो चेंडू अडवण्यात अपयश आले होते. इतकेच नव्हे तर त्या चेंडूवर चौकार देखील गेला होता.
हा चौकार सुटल्यानंतर ट्रेंट बोल्टला संताप आला होता. त्याने रागात काहीतरी म्हटले देखील होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया नोंदवत आहेत.
https://twitter.com/lodulalit001/status/1388502413762461706?s=20
अंबाती रायुडूची वादळी खेळी
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर २१८ धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये संघातील अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूने तुफानी फलंदाजी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. त्याने अवघ्या २७ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या होत्या. तसेच फाफ डू प्लेसिसने ५० आणि मोईन अलीने ५८ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहच्या गोलंदाजीला लागला सुरुंग, सीएसकेविरुद्ध केली आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी