ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची सोमवारी भारतात मोठी चर्चा होती. सोशल मीडियावर तर त्याच्या नावाने अनेक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामागे कारण असे की कमिन्सने सोमवारी जाहीर केले आहे की तो भारतातील कोरोनाग्रस्तांसाठी मदतीसाठी पंतप्रधान मदत निधीला तब्बल ५०००० डॉलर्स दान करणार आहे.
सध्या भारतात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. अनेक रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत आहे, तर कोणाला हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये. त्यामुळे सध्या अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटी, फाऊंडेशन्स पुढे येऊन मदतीचा हात पुढे करत आहेत. त्यात आता कमिन्सचाही समावेश झाला आहे.
कमिन्स सध्या इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामासाठी भारतातच आहे. त्याने सोमवारी ट्विट करत ही माहिती दिली होती की तो ५०००० डॉलर दान करणार आहे. त्याने हे दान प्रामुख्याने भारतीय हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा खरेदीसाठी केले असल्याचेही त्याने सांगितले आहे.
त्याच्या या निर्णयानंतर अनेक भारतीयांनी त्याचे आभार मानले आहेत. त्याचे आभार व्यक्त करणाऱ्या अनेक पोस्टही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. तसेच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही त्याचे या निर्णयाबद्दल कौतुक केले आहे.
विशेष म्हणजे भारतातील बिकट परिस्थिती पाहून काही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयपीएलच्या १४ व्या हंगामातून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे खेळाडू माघार घेत असताना दुसरीकडे मात्र, कमिन्सने पंतप्रधान मदत निधीला पैसे दान केल्याने देखील त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
🙌🙌🙌🙌🙌🙏🙏🙏 https://t.co/zqpzEVfXx3
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 26, 2021
Give him a PAT on the back and the night off too @KKRiders 👏👏#CoronavirusIndia #IPL2021 https://t.co/a9uKCyvdQm
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 26, 2021
You’re a bloody gem 💎 https://t.co/pahVxQidFZ
— Megan Schutt (@megan_schutt) April 26, 2021
Pat Cummins 👏🏼 https://t.co/7oS83mnky2
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) April 26, 2021
hats off 👏brother
— Mohammad Amir (@iamamirofficial) April 26, 2021
https://twitter.com/Tonishark3/status/1386646145707905024
https://twitter.com/abdevilliers181/status/1386711391021658114
Pat Cummins has donated $50,000 to PM Cares Fund to purchase oxygen supplies for hospitals in India.
Huge Respect 🥺🙏
Thanks pat 😍❤#ThanksPat#PatCummins pic.twitter.com/qisA5PUfdX
— Abhiii (@_abhijithh) April 26, 2021
Man with Golden Heart Pat Cummins
Huge Respect 🥺🙏
Thanks pat 😍❤#ThanksPat#PatCummins pic.twitter.com/ZCcGyowCNf— Ashutosh Srivastava 🇮🇳 (@sri_ashutosh08) April 26, 2021
Pat Cummins has announced that he will contribute $50,000 towards the purchase of oxygen supplies for India's hospitals.
He's encouraged fellow #IPL2021 players to contribute as well.
Immense respect for this man 👏 pic.twitter.com/oVAbs3mARM
— Wisden India (@WisdenIndia) April 26, 2021
— Sagar (@sagarcasm) April 26, 2021
Indians watching Australian cricketer Pat Cummins leading the call to donate in PM Cares fund & help India recover amidst humanitarian crisis while playing #IPL2021
Thanks Pat for this beautiful gesture! pic.twitter.com/y21gt3v6au— Vishal Verma (@VishalVerma_9) April 26, 2021
https://twitter.com/itsKabir16/status/1386646531743174661
भारतीय लोकांचे कमिन्सने केले कौतुक
पॅट कमिन्सने दान करणार असल्याचे ट्विट करताना भारतीय लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दलही कौतुकाचे उद्गार काढले आहेत.
त्याच्या ट्विटमध्ये लिहिलेल्या संदेशात असे म्हटले आहे की त्याला भारत देश आवडतो. तसेच तो आजपर्यंत भेटलेल्या लोकांपैकी भारतीय लोक हे चांगले असल्याचेही त्याने म्हटले आहे. एवढेच नाही तर त्याने असेही म्हटले आहे की भारतीय सरकारने या कठीण काळातही आयपीएल सुरु ठेवावी, कारण एकीकडे कठीण परिस्थिती असताना आयपीएलमुळे काही तास भारतीय लोकांना आनंद देतात.
— Pat Cummins (@patcummins30) April 26, 2021
आयपीएलमध्ये कोलकाता संघाचा भाग आहे कमिन्स
कमिन्स सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. त्यामुळे तो १४ व्या आयपीएल हंगामासाठी भारतातच आहे. त्याने या हंगामात आत्तापर्यंत ५ सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एका अर्धशतकासह त्याने ८२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! सुनील नारायण शुन्यावर बाद तर झालाच पण गौतम गंभीरच्या या नकोशा विक्रमाची बरोबरीही केली
व्हिडिओ : वाह रे पठ्ठ्या! राहुल त्रिपाठीने चक्क कोलांटीउडी मारत घेतला झेल