पुणे: सत्यम व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित 4थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत विपुल खैरे(3-17)याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर वेंकीज संघाने सत्यम व्हेकेशन्स संघाचा 42 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब क्रिकेट मैदान येथे पार पडलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना वेंकीज संघाने 20षटकात 9बाद 130अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
यात अरविंद चौहानने 30धावा, विपुल खैरेने 26धावा व रोहित गुंडने 28धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. सत्यम व्हेकेशन्सकडून संजय जोशी(4-25), प्रवीण कारले (2-21)यांनी सुरेख गोलंदाजी करत वेंकीज संघाला 130धावांवर रोखले.
130धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सत्यम व्हेकेशन्स संघाचे फलंदाज झटपट बाद होत गेले. त्यामुळे त्यांचा डाव 20षटकात 88 धावांवर संपुष्टात आला. यात अजित गव्हाणेने 25धावा, अविनाश शिंदेने 21धावांची सर्वाधिक खेळी केली.
वेंकीजकडून विपुल खैरेने 17धावांत 3 गडी बाद केले. विपुलला मयूर टिंगरे(2-9), व ताहीर शेख(2-12)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी विपुल खैरे ठरला.
स्पर्धेतील विजेत्या वेंकीज संघाला करंडक व 40हजार रुपये, तर उपविजेत्या सत्यम व्हेकेशन्स संघाला करंडक व 25हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सत्यम व्हेकेशन्सचे चेअरमन सत्यप्रकाश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
अंतिम फेरी: वेंकीज: 20षटकात 9बाद 130धावा(अरविंद चौहान 30(23,2×4), विपुल खैरे 26(23,1×4, 2×6), रोहित गुंड 28 (26, 2×4, 1×6), संजय जोशी 4-25, प्रवीण कारले 2-21)वि.वि.सत्यम व्हेकेशन्स: 20षटकात सर्वबाद 88धावा(अजित गव्हाणे 25(18, 2×4), अविनाश शिंदे 21(15), विपुल खैरे 3-17, मयूर टिंगरे 2-9, ताहीर शेख 2-12); सामनावीर-विपुल खैरे; वेंकीज 42धावांनी विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: दिव्यांग हिंगणेकर(245धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: सागर बिरवाडे(11विकेट )
मालिकावीर: संजय जोशी(213धावा व 12विकेट)