बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा अर्धशतकाला दोन धावा कमी असताना बाद झाला. रोहितनंतर सलामीवीर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी संघासाठी महत्वपूर्णधावा केल्या. विराटने यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात यशस्वी ठरललेल्या फलंदाजांच्या यादीत आपले स्थान अधिक भक्कम केले.
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर वनडे विश्वचषक 2023चा 17वा सामना खेळला गेला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. रोहितने 40 चेंडूत 48, तर गिलने 55 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने 48 चेंडूंचा सामना केल्यानंतर स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, विराट कोहली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने श्रीलंकेचा माजी दिग्गज माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याला मागे टाकत चौथा क्रमांक पडकावला. (Virat Kohli has now become the fourth highest run-getter in international cricket)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
34357 – सचिन तेंडुलकर
28016 – कुमार संगकारा
27483- रिकी पाँटिंग
25958* – विराट कोहली
25957 – माहेला जयवर्धने
विश्वचषकातील 17व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश- लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसूम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम.
महत्वाच्या बातम्या –
आनंदी आनंद गडे! गिलच्या दोन कडक सिक्सने सारा झाली खूश, व्हिडिओ पाहाच
“आपल्याला मेडल पाहिजे”, ‘फ्लाईंग कॅच’ टिपताच जडेजाची फिल्डिंग कोचकडे मागणी