Loading...

तेंडुलकर, पाँटिंगप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत विराट कोहलीही सामील

बंगळुरु। रविवारी(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिका 2-1 ने जिंकली.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 91 चेंडूत 8 चौकारांसह 89 धावा केल्या. याबरोबरच त्याने एक खास पराक्रम केला आहे. विराटची वनडे कारकिर्दीत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही 100 वी वेळ होती. यामध्ये विराटच्या 43 शतकांचा आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्यामुळे विराट वनडेमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी असा कारनामा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस या दिग्गजांनी केला आहे.

वनडेमध्ये सर्वाधिकवेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम सध्या सचिनच्या नावावर आहे. त्याने 145 वेळा असा कारनामा केला आहे. यामध्ये त्याच्या 49 शतकांचा आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 50 + धावा करणारे फलंदाज –

Loading...

145 वेळा – सचिन तेंडुलकर

118 वेळा – कुमार संगकारा

112 वेळा – रिकी पाँटिंग

103 वेळा – जॅक कॅलिस

100 वेळा – विराट कोहली 

You might also like
Loading...