भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाचव्या दिवशीही पावसाचे आगमन झाल्याने खेळ एक तास उशिराने सुरू झाला होता. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मजेशीर कृत्य करताना दिसून आला आहे.
पाचव्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार ३ वाजता सुरू होणार होता. परंतु साउथॅम्प्टनमध्ये हलकासा पाऊस सुरू असल्याने हा खेळ ४ वाजता सुरू करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली हे पाऊस थांबण्याची वाट पाहताना दिसून आले. याचवेळी विराट कोहली ड्रेसिंग रूमच्या बाहेर उभा राहून काजू खाताना दिसून आला होता.(Virat Kohli seen eating outside dressing room beside Ravi Shastri fans said pehle pet Puja)
चाहत्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
विराट कोहलीचा ड्रेसिंग रूमच्या बाहेर उभा राहून खात असतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर चाहतेही आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना त्याला पाहून ‘आधी पोटोबा मग विठोबा’ ही म्हण आठवली आहे. एका चाहत्याने मजेशीर प्रतिक्रिया देत लिहिले की, “आधी पोट पूजा.” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “चिकु काजू खात आहे.”
तर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले आहेत की, इतक्या मोठ्या आणि दबावाच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार इतक्या आरामात कसा काय खात आहे?
https://www.instagram.com/p/CQawyWnNhGa/?utm_source=ig_web_copy_link
Cheeku eating Kaaju 😀😀👌🏻👍🏻🏏 #ViratKohli #WTCFinal @imVkohli pic.twitter.com/6WTs1jntOr
— Kavishwar Zalke (कविश्वर झलके) (@KaviZalke) June 22, 2021
OP @imVkohli eating kaju kishmish when vella. pic.twitter.com/HYo8mx2RmW
— Carl Weathers – Acting Coach (@sharmadishant) June 22, 2021
भारतीय संघ मजबूत स्थितीत
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, न्यूझीलंड संघ या सामन्यात मजबूत स्थितीत होता. परंतु मोहम्मद शमीच्या वेगवान गोलंदाजीने न्यूझीलंड संघाचा फलंदाजी क्रम उध्वस्त केला. शमीने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ४ गडी बाद केले. न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात सर्वबाद २४९ धावा करता आल्या. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना भारतीय संघाच्या धावा २ बाद ६४ इतक्या आहेत. यामध्ये रोहित शर्माने ३० धावांचे योगदान दिले तर, सलामीवीर फलंदाज शुबमन गिल अवघ्या ८ धावा करत माघारी परतला आहे. तसेच कर्णधार कोहली नाबाद ८ धावांवर फलंदाजी करत आहे. तर चेतेश्वर पुजारा नाबाद १२ धावांवर फलंदाजी करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराहकडून झाली ‘मोठी चूक’, लाईव्ह सामन्यात मैदान सोडून जावं लागलं बाहेर
शुबमन-रोहितची विकेट टीम साउथीसाठी ठरली ‘विक्रमी’, घातली मोठ्या किर्तीमानाला गवसणी
नादच खुळा! विराटने आयसीसीच्या स्पर्धांच्या फायनलमध्ये केलेत सचिन-पॉटींगपेक्षाही मोठे विक्रम