रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात होणारा सामना म्हणजे दर्शकांचे मनोरंजन निश्चित असते. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळत असते. असेच काहीसे चित्र रविवारी (३ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात देखील पाहायला मिळाले. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने पंजाब किंग्स संघावर ६ धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या विजयानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने पंजाब किंग्स संघाला ट्रोल केले आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हे दोन्ही आमने सामने आले होते. त्यावेळी पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर ३४ धावांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर पंजाब किंग्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या ड्रेसिंग रूमचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून, “इथे तर सर्व शांत आहे” असे लिहिले होते. हा फोटो पंजाब किंग्स संघाने आता काढून टाकला आहे.
हा फोटो पंजाब किंग्स संघाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काढला असला तरी देखील, विराटला ही गोष्ट लक्षात होती. शेवटी त्याने पंजाब किंग्स संघावर विजय मिळवला आणि जोरदार प्रत्युत्तरही दिले. हा सामना झाल्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जमले होते. त्यावेळी विराट कोहली, “खूप शांतता आहे आज” असे म्हणताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडू एकमेकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. तर प्रशिक्षक देखील आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे.
Virat Kohli took a dig at #PunjabKings ‘dug-out’ tweet which was tweeted earlier this year in #IPL2021 during their match against #RCB. https://t.co/DFzoxAlF4P
— Neelabh (@CricNeelabh) October 4, 2021
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर देवदत्त पडीक्कलने ४० आणि विराट कोहलीने २५ धावांचे योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघाकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. तसेच ऍडम मार्करमने शेवटी २० धावांची खेळी केली.
परंतु पंजाब किंग्स संघाला त्यांचे आव्हान पूर्ण करता आले नाही. पंजाब किंग्स संघाला २० षटक अखेर १५८ धावा करण्यात यश आले. यासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ६ धावांनी विजय मिळवून प्लेऑफचे तिकीट मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात धोनी पहिल्यांदाच इतका वाईट खेळला, लाजिरवाणा विक्रम नावावर झाला
एकच मारला पण सॉलिड मारला; चेन्नईविरुद्ध कडक षटकार ठोकत पंतची ‘या’ विक्रमात राहुलशी बरोबरी
उथप्पाचा चेंडू पकडण्यासाठी नॉन स्ट्राईकरपर्यंत धावला यष्टीरक्षक पंत; अश्विनही म्हणे, ‘असं का करतोय?’