आशिया चषक 2022 (Asia Cup) स्पर्धा चांगलीच रोमांचक होत आहे. 2018 नंतर ही स्पर्धा खेळण्यात आल्याने काही संघांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यातच सुपर फोरचे सामने सुरू असल्याने संघामध्ये जिंकण्याची चढाओढ सुरू आहे. सुपर फोरमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यासाठी भारतीय संघात संधी मिळालेल्या रिषभ पंत याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाचा प्रमुख यष्टीरक्षक कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
आशिया चषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघाने दिनेश कार्तिक याच्यासोबत सुरुवात केली होती. मात्र त्याला केवळ दोन चेंडू खेळण्याची संधी मिळाली. यानंतर संघ व्यवस्थापनाने रिषभला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. मात्र, तो 14 धावा करत खराब फटका खेळून तंबूत परतला. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याच्यावर टीका होत आहे.
रिषभ पंत कसोटी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसतो. मात्र, भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना तो दडपणाखाली असल्याचे दिसतो. पंतने भारतासाठी 56 टी20 सामन्यांमध्ये 24 च्या सरासरीने 897 धावा केल्या आहेत. यात त्याने तीन अर्धशतके ठोकली आहेत. यात त्याचा स्ट्राइक रेट 126 आहे. त्याचवेळी आयपीएलमध्ये 2 शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४५ आणि सरासरी 32 पर्यंत वाढते.
दिनेश कार्तिकबद्दल बोलायचे झाले तर तो 2006 पासून भारताकडून टी20 खेळत आहे. वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली 2006 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 सामना खेळला होता. या सामन्यात दिनेश कार्तिकने 28 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी करत भारताला सहा गडी राखून विजय मिळवून दिला होता. कार्तिकने भारतासाठी 49 टी20 सामन्यांमध्ये 140 च्या स्ट्राइक रेटने 592 धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी 28 आहे. यावर्षीच्या आयपीएलपासून तो शानदार फॉर्म मध्ये असून त्याने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या खेळ्या केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेहमी भारतीय संघावर निशाणा साधणारा पाकिस्तानी क्रिकेटर उतरला अर्शदीपच्या समर्थनार्थ, म्हणतोय..
‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!