भारतीय क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय मालिकांचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायभूमीत भारतीय संघ ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर लगेचच जूनच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर २ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. तर जुलैच्या सुरुवातीला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना आणि ३ सामन्यांची वनडे व ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे.
दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या मालिकांसाठी (England vs India) गुरुवारी (१६ जून) भारतीय संघाचा एक तुकडी रवाना झाला आहे. या तुकडीसंगे संघातील प्रमुख खेळाडू इंग्लंडला गेले (Indian Players Leaves For England) आहेत, जे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाहीत. परंतु भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मात्र या तुकडीसोबत इंग्लंडला रवाना झाला नाही. ज्यानंतर त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभे होत आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे १ जुलैपासून ऍजबस्टन येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. तसेच तो संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर झाला आहे. अशात आता रोहितही (Rohit Sharma) भारतीय संघाच्या पहिल्या तुकडीसह न गेल्याने तो फिट नसल्याच्या चर्चा आहेत. मात्र या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागत रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चालू टी२० मालिका संपल्यानंतर दुसऱ्या तुकडीसह इंग्लंडला रवाना होईल (Rohit Sharma Update) असे म्हटले जात आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आणि सलामीवीर शुबमन गिल गुरुवारी मुंबईवरून इंग्लंडला रवाना झाले आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड विरुद्ध भारत पाचवी कसोटी: ऍजबस्टन, १-५ जुलै
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA: भारतासाठी ‘करो या मरो!’, महत्त्वाच्या सामन्यात कशी असू शकते दोन्ही संघाची ‘प्लेइंग ११’
एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन
आठवणीतील सामना: २३ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात रोमांचकारी सामना, पाहा व्हिडिओ