विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सामन्याचा पाचव्या दिवशी (मंगळवार, २२ जून) दोन्ही संघाकडून जबरदस्त खेळ पाहण्यास मिळाला. पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर मजबूत पकड बनवली आणि त्यांचा डाव अवघ्या २४९ धावांवर गुंडाळला. यानंतर भारतीय संघाने फलंदाजी करताना दिवसाखेर २ गडी गमावत ३२ धावांची आघाडी घेतली आहे. जरी भारतीय संघ सध्या चांगल्या स्थितीत असला तरीही इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन याने पुन्हा भारतीय संघावर टीका केली आहे.
वॉनने नेहमीप्रमाणे भारतीय संघाविरोधात भाष्य केले आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडव्यतिरिक्त इतर ठिकाणी खेळला गेला असता. तर न्यूझीलंड संघाने आतापर्यंत हा सामनाही जिंकलाही असता, असे त्याचे म्हणणे आहे. मंगळवारी रोजी, ट्वीट करत वॉनने म्हटले की, “विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना उत्तरेच्या वरील दिशेला असलेल्या एखाद्या ठिकाणी झाला असता. तर, एका मिनिटासाठी सुद्धा खेळ थांबला नसता आणि न्यूझीलंड संघ आतापर्यंत विजेताही ठरला असता.”
तसे तर, वॉनने भारतीय संघावर निशाणा साधण्याची ही पहिली वेळ नाही. वॉन नेहमी भारतीय संघाविरुद्ध काही-न-काही भाष्य करतच असतो.
If this #worldtestchampionshipfinal been played up north they wouldn’t have missed a minutes play … #Justsaying #INDvsNZ !! NZ would have been champions by now … 😜
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 22, 2021
यापुर्वी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवला होता. इंग्लंडच्या पराभवानंतर मायकल वॉनने ट्विट केले होते की, “न्यूझीलंड एक उच्च दर्जाचा संघ आहे. ज्यांनी परिस्थिती अनुकूल फलंदाजी केली. गोलंदाजी देखील उत्कृष्ट केली. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणदेखील जबरदस्त होते. मी अशी कल्पना करत आहे की, आता पुढच्या आठवड्यात ते अंतिम सामन्यात भारतीय संघालाही पराभूत करतील.” यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी वॉनला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजला तिहेरी धक्का, कसोटी मालिकेत ०-२ ने धुव्वा उडाल्यानंतर आयसीसीने ठोठावला मोठा दंड
जसप्रीत बुमराहकडून झाली ‘मोठी चूक’, लाईव्ह सामन्यात मैदान सोडून जावं लागलं बाहेर
शुबमन-रोहितची विकेट टीम साउथीसाठी ठरली ‘विक्रमी’, घातली मोठ्या किर्तीमानाला गवसणी