बेंगलोर | १७ एप्रिल २०१० साली आयपीएल दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडीयन्स यांच्यातील सामन्यावेळी एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता.
यामध्ये पाच सुरक्षारक्षक आणि १५ लोक जखमी झाले होते.
या बॉम्बस्फोटातील १४ पैकी तीन आरोपींनी मंगळवारी (३ जुलैला) आपला गुन्हा कबूल केला आहे.
गौहर अजीज खोमानी, कमाल हसन आणि मोहम्मद कफील या तिन्ही आरोपींनी शपथपत्र देत कोर्टासमोर आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली.
सध्या दिल्लीत राहत असलेले हे आरोपी मुळचे बिहारचे आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी यासिन भटकळ सध्या तिहार जेलमध्ये आहे. तर इंडियन मुजाहिद्दीनशी संबधीत असलेला दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीची पुण्याच्या येरवडा तुरुंगात कैद्याकडून हत्या करण्यात आली आहे.
या तिन्ही आरोपींना ९ जुलैला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-Blog: हॅप्पी बर्थडे धोनी- रांची का छोकरा ते कॅप्टन कूल माही
-दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा पराभव, इंग्लंडने केली १-१ बरोबरी
-Video: एमएस धोनीला टीम इंडीयाकडून वाढदिवसाच्या निमित्ताने अशा मिळाल्या खास शुभेच्छा