जगातील सर्वात श्रीमंत असलेली स्पर्धा आयपीएलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. कॅशरिक लीगची वाट पाहतात. टी-२० स्वरूपात खेळल्या गेलेल्या या लीगमध्ये, एकीकडे फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्यास तयार असतो, तर गोलंदाज फलंदाजाला लवकरात लवकर बाद करण्याच्या प्रयत्नात असतो. फलंदाज हा गोलंदाजाचा सर्वात कठीण चेंडू देखील निर्धाव जाऊ देऊ नाही. पण तरीही गोलंदाजाचे प्रयत्न सुरू असते.
खरं तर टी २० फॉर्मेटने क्रिकेटला वेगवान बनवलं आहे. जर फलंदाजाने काही चेंडू निर्धाव केले तर त्याच्यावर दबावही वाढतो. परंतु गोलंदाजही काही कमी नसतात. फलंदाजांना ते चकमा देतात आणि निर्धाव चेंडू टाकतात. या लेखात त्या ५ गोलंदाजांविषयी जाणून घेऊ ज्यांनी आयपीएल टी२० स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात जास्त निर्धाव चेंडू टाकलेत.
५. पियुष चावला (Piyush Chawla) – ११०९ निर्धाव चेंडू
पीयूष चावलाने २००८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण नंतर तो केकेआरमध्ये सामील झाला आणि बर्राच काळ केकेआरमध्ये राहिला. आता तो एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघात दाखल झाला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएल कारकीर्दीत १५७ सामने खेळले आहेत आणि ५२०.४ षटके गोलंदाजी केली आहेत. या गोलंदाजीत त्याने ११०९ चेंडू निर्धाव टाकले आहेत. सामन्यात एकदाही त्याला ५ विकेट्स मिळाल्या नाहीत परंतु त्याने २ वेळा ४-४ विकेट्स घेतल्या आहेत.
४. अमित मिश्रा (Amit Mishra) – ११११ निर्धाव चेंडू
या यादीत अमित मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहेत. ज्येष्ठ फिरकी गोलंदाज अमित मिश्राने आतापर्यंत १४७ सामन्यात ७.३५ च्या इकॉनमी रेटने १५७ बळी घेतले आहेत. त्यात त्याने एका डावात ५ विकेट्स घेतल्या, तर ३ वेळा त्याने एका डावात ४-४ विकेट्स घेतल्या आहेत.
आतापर्यंत त्याच्या खात्यात ११११ निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. २००८ पासून अमित मिश्रा आयपीएल खेळत आहेत, परंतु आजपर्यंत त्याला एकदाही ट्रॉफीचा मिळवता आली नाही. मिश्राने दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्स या संघांतून आयपीएल सामने खेळले आहेत आणि सध्या तो आता दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य आहे. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने ७ वर्षानंतर २०१९ मध्ये प्ले ऑफ पर्यंत मजल मारली.
३. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) – ११२४ निर्धाव चेंडू
२०११ च्या पुणे वॉरियर्स इंडियाकडून आयपीएल कारकीर्दीत पदार्पण करणारा भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत तिसर्या स्थानावर आहे. भुवनेश्वर हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा तिसरा गोलंदाज आहे.
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत खेळलेल्या ११७ सामन्यात १३३ बळी घेतले आहेत. या दरम्यान भुवीने आयपीएलमध्ये ११२४ चेंडू निर्धाव टाकले आहेत. एका सामन्यात एक वेळा ५ आणि दोन वेळा ४ विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
गेल्या आयपीएलमध्ये त्याची कामगिरी काही खास बघायला मिळाली नाही, परंतु यावेळी तो संघासाठी अधिक चांगली कामगिरी करण्यास नक्कीच उत्सुक असेल. भुवीने आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये पर्पल कॅप जिंकली आहे. सन २०१६ मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून आयपीएल चषक जिंकला आहे.
२. लसिथ मलिंगा (Lasith Malinga) – ११५५ निर्धाव चेंडू
या यादीतील दुसरे नाव आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचे आहे. सर्वाधिक निर्धाव चेंडूच्या बाबतीत मलिंगा आयपीएलमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे. हा वेगवान गोलंदाज सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
मलिंगाने आतापर्यंत १२२ सामने खेळले आहेत आणि त्यात १७० बळी घेतले आहेत. त्याने सामन्यात ६ वेळा ४ विकेट्स घेतले आहेत तर एका सामन्यात एकदा ५ विकेट्स घेतले आहेत. लसिथ मलिंगाच्या नावावर आयपीएलमध्ये ११५५ निर्धाव चेंडूची नोंद आहे.
लसिथ मलिंगानेच्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत चार वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. तसेच २०११ च्या आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल त्याला पर्पल कॅप देखील देण्यात आली होती.
१. हरभजन सिंग (Harbhajan Singh) – १२४८ निर्धाव चेंडू
दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हे या यादीतील पहिले नाव आहे. आयपीएल कारकीर्दीची सुरुवात हरभजनने मुंबई इंडियन्सपासून केली असून सध्या तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. हरभजन आयपीएलमधील सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज आहे.
हरभजन सिंगने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १२४८ निर्धाव चेंडू टाकले आहेत. हरभजनने आतापर्यंत १६० सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर १५० बळी आहेत. त्याने एका सामन्यात ४ विकेट्स आणि एकदा ५ विकेट्स मिळवल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा हरभजन तिसरा गोलंदाज आहे. आयपीएल चषक चार वेळा जिंकण्याचा विक्रमही या अनुभवी ऑफ स्पिनरच्या नावावर आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून तीन वेळा आणि एकदा चेन्नईकडून ट्रॉफी जिंकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना व्हायरस असूनही आयपीएल २०२० होणार सुपर-डूपर हिट; जाणून घ्या कारण…
‘भारताला विश्वचषक जिंकून देऊनच निवृत्त होणार’, पहा कोण म्हणतंय
-रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम
-कर्टिस कॅम्फर – आयर्लंड क्रिकेटचा भविष्यातील सितारा
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले