पुणे: सेन्ट्रल रेल्वे, रिग्रीन, आझम स्पोर्ट्स अकादमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम कॅम्पस मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उदघाटन एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलजार शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्वेता जाधव व वैष्णवी काळे यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर सेन्ट्रल रेल्वे संघाने वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाला ११८ धावांनी पराभूत केले. सेन्ट्रल रेल्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सालामीवीर श्वेता जाधवने १२ चौकारांसह ७१ धावांची खेळी केली. तिला वर्षा चौधरीने ५१ धावा (२ चौकार व एक षटकार) करताना सुरेख साथ दिली.
सेन्ट्रल रेल्वे संघाने निर्धारित १५ षटकात २ बाद १४४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. वेरॉक संघाकडून श्रद्धा पोखरकर व मनाली जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. सेन्ट्रल रेल्वे वैष्णवी काळेच्या गोलंदाजीसमोर वेरॉक संघाचा १२ षटकात सर्वबाद २६ धावांत डाव गडगडला.
वैष्णवी काळेने एकाच षटकात ३ गडी बाद केले. तिला सारीका कोळीने २, अपूर्वा भारद्वाज व वर्षा चौधरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद करताना वैष्णवीला सुरेख साथ दिली. वेरॉक संघाच्या मनाली जाधवने १२ धावांची खेळी केली. श्वेता जाधवला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे रिग्रीन संघाने पुणे फाल्कन्स संघाला ५ गडी राखून पराभूत केले. पुणे फाल्कन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पुणे फाल्कन्स संघाने निर्धारित १५ षटकांत ६ बाद १०१ पर्यंत मजल मारली. फाल्कन्स संघाकडून पूनम खेमणारने ३० (४ चौकार), पार्वती बाकले २१ (३ चौकार), पूजा जैनने नाबाद १७ (२ चौकार) यांनी चांगली फलंदाजी केली.
रिग्रीन संघाकडून मुक्ता मगरेने ३ तर, सायली अभ्यंकर व प्रियांका घोडके यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. रिग्रीन संघाने १४.२ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १०२ धावा करताना विजय साकारला.
रिग्रीन संघाकडून मुक्ता मगरेने नाबाद ४४ (५ चौकार), प्रियांका घोडकेने १६ (२ चौकार) व चार्मी गवई १६ (३ चौकार) धावा करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फाल्कन्स संघाकडून पूजा जैन व सविता ठाकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मुक्ता मगरेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अतितटीच्या झालेल्या लढतीत आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने पीडीसीए संघाला ५ धावांनी पराभूत केले. आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १५ षटकांत १ बाद ११६ धावांपर्यत मजल मारली. आझम स्पोर्ट्स अकादमी संघाकडून किरण नवगिरेने ५६ (६ चौकार, २ षटकार) तर, सोनाली शिंदेने ३८ (६ चौकार) धावांची खेळी केली.
पीडीसीए संघाकडून रोहिणी मानेने एक गडी बाद केला. सोनाली शिंदेच्या भेदक गोलंदाजीमुळे पीडीसीए संघाला १४.५ षटकांत सर्वबाद १११ धावाच करता आल्या. सोनाली शिंदेने ४, गौतमी नाईक, प्रिया बोकरे व किरण नवगिरेने प्रत्येकी २ गडी बाद केले. पीडीसीए संघाकडून प्रतिभा अरगडे २४ (४ चौकार), अदिती काळे १९ (२ चौकार), रोहिणी माने ११ (२ चौकार) यांनी चांगली लढत दिली. सोनाली शिंदेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
सेन्ट्रल रेल्वे : १५ षटकांत २ बाद १४४ (श्वेता जाधव ७१ (१२ चौकार), वर्षा चौधरी ५१ (२ चौकार, १ षटकार), श्रद्धा पोखरकर ३-०-१९-१, मनाली जाधव ३-०-२५-१). वेरॉक वेंगसरकर अकादमी : १२ षटकांत सर्वबाद २६ (मनाली जाधव १२, कश्मीरा शिंदे ४, वैष्णवी काळे १-०-१-३, सारिका कोळी २-२-०-२, अपूर्वा भारद्वाज ३-१-६-१, वर्षा चौधरी ३-०-७-१)
पुणे फाल्कन्स : १५ षटकांत ६ बाद १०१ (पूनम खेमणार ३० (४ चौकार), पार्वती बाकले २१ (३ चौकार), पूजा जैन १७ (२ चौकार) मुक्ता मगरे ३-०-१८-३, सायली अभ्यंकर २-०-१४-१, प्रियांका घोडके २-०-८-१). रिग्रीन : १४.२ षटकांत ५ बाद १०२. (मुक्ता मगरे ४४ (५ चौकार), प्रियांका घोडके १६ (२ चौकार), चार्मी गवई १६ (२ चौकार), पूजा जैन ३-०-१५-२, सविता ठाकर २.२-०-१४-२)
आझम स्पोर्ट्स अकादमी : १५ षटकांत १ बाद ११६ (किरण नवगिरे ५९ (६ चौकार, २ षटकार), सोनाली शिंदे ३८ (६ चौकार), रोहिणी माने ३-०-१८-१) पीडीसीए : १४.५ षटकांत सर्वबाद १११ (प्रतिभा अरगडे २४ (४ चौकार), अदिती काळे १९ (२ चौकार), रोहिणी माने ११ (२ चौकार), सोनाली शिंदे ३-०-२०-४, किरण नवगिरे ३-०-१५-२, गौतमी नाईक २.५-०-१८-२, प्रिया भोकरे ३-०-२५-२)