भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. पुढील काही आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर खेळाडू आयपीएलच्या तयारीला लागणार आहेत. माजी कर्णधार एमएस धोनीने तर आयपीएलसाठी सरावही सुरु केला आहे.
याच पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएलच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. यात डफ आणि फेल्प्स या संस्थेने २०१९ रोजी केलेल्या एका सर्वेमध्ये आयपीएलच्या संघांच्या किंमती सांगितल्या होत्या. सध्या याच संघाच्या किंमतींची जोरदार चर्चा आहे.
लीग स्पर्धांमध्ये संघांना फ्रचांईजी असेही म्हटले जाते. अशाच भारतातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलमधील फ्रचांईंजींच्या किंमतीची चर्चा आहे. यातील मुंबई इंडियन्स या फ्रचांईंजीची किंमत तब्बल ८०९ कोटी असल्याचे या सर्वेक्षणात सांगितले गेली आहे. तर दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्ज असून त्यांची किंमत ७३२ कोटी आहे. मुंबई फ्रचांईजीची मालिकी अंबानी यांच्याकडे आहे.
यातील ८व्या स्थानावर २७१ कोटींसह राजस्थान राॅयल्स ही फ्रचाईजी आहे. शाहरुख खानची सहमालकी असलेली कोलकाता नाईट रायडर्स या यादीत तिसऱ्या स्थानी असून त्यांची किंमत ६२९ कोटी आहे. तर गेल्या १२ हंगामात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ज्या संघाकडून खेळला ते राॅयस चॅलेंजर बेंगलोर ५९५ कोटींसह चौथ्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमधील फ्रचाईंजींची किंमत-
८०९ कोटी – मुंबई इंडियन्स
७३२ कोटी – चेन्नई सुपर किंग्स
६२९ कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
५९५ कोटी – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
४८३ कोटी – सनरायझर्स हैद्राबाद
३७४ कोटी – दिल्ली कॅपिटल्स
३५८ कोटी – किंग्स इलेव्हन पंजाब
२७१ कोटी – राजस्थान रॉयल्स
महत्त्वाच्या बातम्या-
–टी२० सामन्यात हार्दिक पंड्याचे तुफानी शतक; अर्ध्या संघालाही पाठवले तंबूत
–असा कारनामा करणे नक्कीच सोपं नव्हतं, पण १६ वर्षीय शेफाली करुन दाखवलंच!
–तब्बल १३ वर्षांनंतर बंगाल रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात