१९७० मध्ये वर्णभेदाच्या कारणाने आफ्रिकेवर आलेल्या बंदीमुळे तेथील क्रिकेटपटूंचे मोठे नुकसान झाले. अनेक क्रिकेटपटूंची भविष्य अंधारात गेली. पण २१ वर्षानंतर १९९१ला आफ्रिकेत क्रिकेट परतले.पण तोपर्यंत बर्याच क्रिकेटपटूंची प्रतिभा दीर्घ प्रतीक्षेत नष्ट झाली. यात क्लाइव राइस (Clive Rice ) या क्रिकेटपटूचेही नाव आहे, जर त्यांना मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली असती तर आज ते आज जगातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असते.
पण कसोटी क्रिकेट खेळण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. २५ वर्षाच्या (१९६९-९४) प्रदीर्घ प्रथम श्रेणी कारकीर्दीवरच त्यांना समाधान मानावे लागले. राइस नॉटिंगहॅमशायर आणि ट्रान्सवाल यांच्यासाठी सर्वाधिक सामने खेळले. त्यांनी रिचर्ड हॅडलीबरोबर गोलंदाजी करताना सुरुवात नॉटिंगहॅमशायरला काउंटी क्रिकेटमध्ये अनेकदा यश मिळवून दिले.
क्लाइव राइस यांची उत्तम प्रथम श्रेणी कारकीर्द होती. या दरम्यान त्यांनी आक्रमक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीने उत्तम कामगिरी केली. क्लाइव राइस यांनी ४८२ सामन्यात ४१ च्या सरासरीने २६३३१ धावा केल्या, त्यात ४८ शतके आणि १३७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वाधिक धावसंख्या २४६ होती. तसेच त्यांनी ९३० विकेट्स घेतल्या. डावात त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ७/६२ अशी होती.
क्लाइव राइसने १९६९ मध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले होते. त्याचदरम्यान प्रतिबंधित होण्यापूर्वी आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटची मालिका १९६९/७० मध्ये खेळली होती. त्यानंतर क्लाइव राइसची निवड १९७१-७२ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी केली गेली होती, परंतु हा दौरा रद्द करण्यात आला आणि आफ्रिकन क्रिकेटसाठी ‘अंधकार युग’ सुरू झाले, जे पुढे २१ वर्षे चालले.
क्लाइव राइसला कधीही कसोटीची कॅप मिळाली नाही, परंतु १९९१ मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिका पुन्हा क्रिकेटमध्ये परत आले तेव्हा त्यांना सांत्वन म्हणून आपला कर्णधार बनवले गेले. वर्णभेदाच्या काळानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले वनडे कर्णधार ठरले. पण तोपर्यंत ते ४२ वर्षांचे होते, त्यामुळे १९९२ विश्वचषकासाठी त्यांची निवड झाली नव्हती.
बंदी उठल्यानंतर ४ महिन्यांच्या आत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्यावर आला. संघात परतल्यानंतर त्यांनी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मात्र, तो सामना भारताने ३ विकेटने जिंकला. ती तीन वनडे सामन्यांची मालिका भारताने २-१ने जिंकली.
पहिल्याच सामन्यात (पदार्पण) वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्डने आपली छाप सोडली. त्यांनी २९ धावा देऊन ५ बळी घेतले. त्या सामन्यात डोनाल्ड आणि सचिन तेंडुलकर (६२ धावा, १ विकेट) संयुक्तपणे सामनावीर ठरले. त्या आफ्रिकन संघाचा कर्णधार क्लाइव राइस होते. त्यांचे २८ जुलै २०१५ रोजी वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज
या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले
महत्त्वाच्या बातम्या –
अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
२०११च्या विश्वचषकादरम्यान आशिष नेहराला शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरने केली होती ‘ही’ मदत
‘भारताला विश्वचषक जिंकून देऊनच निवृत्त होणार’, पहा कोण म्हणतंय