ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज ऍरॉन फिंच याला स्विंग चेंडूंवर खेळताना नेहमीच अडचणी आल्या. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानेही फिंचला अनेकंदा कोंडीत पकडल्याचे दिसले. याच पार्श्वभूमीवर माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आता आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून व्यक्त झाला आहे.
ऍरॉन फिंच (Aaron Finch) कारकिर्दीत एकून सात वेळा भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याची शिकार बनला. भुवनेश्वरच्या चेंडूवर गमावलेल्या 7 पैकी 4 विकेट्स त्याने एकाच मालिकेत गमावल्या आहेत. 2019 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात भुवनेश्वरने फिंचचा चांगलाच घाम काढला होता. फिंच आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून चांहत्यांच्या प्रश्न उत्तरे देत होता. यावेळी एका चाहत्याने त्याला भुवनेश्वरविरुद्ध खेळताना येणाऱ्या अडचणींविषयी विचारले.
या चाहत्याने प्रश्न विचारला की, “मी तुझा मोठा चाहता आहे. भुवनेश्वर कुमारने तुला अनेकदा अडचणीत आणल्याचे पाहायला मिळाले आहे. याविषयी सविस्तर सांगू शकशील का? खेळताना तुझे पाय मध्ये येतात का?” चाहत्याच्या या प्रश्नावर फिंचने उत्तर दिले की, “होय. हे थांबवण्यासाठी मी 15 वर्ष प्रयत्न केला आहे.”
भुवनेश्वर कुमारसह इतरही स्विंग करू शकणाऱ्या गोलंदाजांसमोर फिंच अनेकदा अपयशी ठरला. असे असले तरी, त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने 2021 साली टी-20 विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकल्यानंतर फिंचने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. आपल्या कारकिर्दीत त्याने 146 वनडे, तर 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने दोन वेळा सर्वोत्तम खेळी केली. 2013 साली इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्याने 156 धावा कुटल्या होत्या. तसेच 2018 साली झिम्बाब्वेविरुद्ध 172 धावांची खेळी केली होती.
दुसरीकडे भुवनेश्वर कुमार मागच्या काही महिन्यांपासून दुखापतीचा सामना करत आहे. 2022 टी-20 विश्वचषकापर्यंत भुवनेश्वर भारताच्या टी-20 संघाचा नियमित खेळाडू होता. मात्र, त्यानंतर निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन यांच्याकडून भूवनेश्वरकडे काही अंशी दुर्लक्ष झाल्याचे दिसते. भुवनेश्वनरे भारतासाठा आतापर्यंत 21 कसोटी, 121 वनडे आणि 87 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान 63 कसोटी, 141 वनडे आणि 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (Aaron Finch admits that playing in front of Bhuvneshwar Kumar was always difficult)
महत्वाच्या बातम्या –
दुखापतग्रस्त विलियम्सनची मोठी प्रतिक्रिया! जाणून घ्या विश्वचषकात खेळणार की नाही?
BREAKING: बांगलादेशला मिळाला नवा कर्णधार! ‘हा’ धुरंधर वाहणार आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये धुरा