क्रिकेटच्या मैदानावर मिस्टर ३६० (Mr 360) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स याने (Ab devilliers) काही महिन्यांपूर्वी सर्वप्रकारच्या क्रिकेटला राम राम केले होते. आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. गेली अनेक वर्षे त्याने आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal challengers Bangalore) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता त्याने या संघात पुनरागमन करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून एबी डिविलियर्स युवा खेळाडूंना घडवण्याचं काम करत आहे. याबाबत बोलताना त्याने संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला अजूनही असे वाटते की, दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमध्ये मला एक भूमिका पार पाडायची आहे. यासह आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी देखील अशीच भावना आहे. मला माहित नाही पुढे काय होणार आहे. मी गेल्या काही वर्षांपासून क्षमता आणि योग्यता असलेल्या काही युवा खेळाडूंचा सांभाळ करत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करत आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी केवळ याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहे. जेव्हा लोकांना कळेल की, मी युवा खेळाडूंना घडवलं आहे. त्यावेळी याला प्रोफेशनलरित्या देखील पाहिले जाऊ शकते.”
अधिक वाचा – निवृत्तीनंतर एबी डिविलियर्सचा भावुक संदेश; म्हणतोय, ‘मी अर्धा भारतीय बनलोय आणि मला याचा अभिमान आहे’
एक फलंदाज म्हणून एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. तसेच आयपीएल स्पर्धेत देखील विराट कोहली सोबतमिळून त्याने अनेक मोठ मोठ्या खेळ्या केल्या होत्या. या दोघांची जोडी आयपीएल स्पर्धेत सर्वात विस्फोटक जोडीपैकी एक मानली जात होती. मात्र, एबी डिविलियर्सला आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. तसेच आयपीएल स्पर्धेचे देखील जेतेपद मिळवता आले नाही.
तसेच निवृत्तीबाबत बोलताना एबी डिविलियर्स म्हणाला की, “मला माहित होते की, मला केव्हा क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करायची आहे. मला तर कधीच या खेळाचा आनंद घेणं थांबवायचं नव्हतं.”
महत्वाच्या बातम्या :
कोरोनापुढे बीसीसीआयने टेकले गुडघे, रणजी ट्रॉफीसह ‘या’ २ देशांतर्गत स्पर्धा केल्या स्थगित
हे नक्की पाहा :