भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने बाजी मारली आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या पाचव्या आणि मालिकेतील निर्णायक लढतीत भारतीय संघाने इंग्लंड संघाचा ३६ धावांनी धुव्वा उडवला आहे. ही मालिका टी२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने देखील महत्वाची होती. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली होती. मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या क्रमवारीत देखील फायदा झाला आहे.
या मालिकेत भारतीय संघाला विजयासाठी प्रबळ मानले जात होते. परंतु इंग्लंड संघाने देखील उत्कृष्ट कामगिरी करत २ सामन्यात विजय मिळवला होता. तसेच ही मालिका सुरू होण्यापूर्वी आयसीसीच्या टी२० क्रमवारीमध्ये प्रथम स्थानी विजराजमान असलेल्या इंग्लंड संघाकडे २७५ गुण होते. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय संघाकडे २६८ गुण होते.
पण नुकत्याच झालेल्या टी२० मालिकेत पराभव झाल्यानंतर इंग्लंड संघ प्रथम स्थानी कायम आहे. परंतु, त्यांना गुणांमध्ये तोटा झाला आहे. इंग्लंड संघांचे ३ गुण कमी झाले आहेत. तर भारतीय संघाला २ गुणांचा फायदा झाला आहे. त्यामुळे इंग्लंड संघ २७२ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर भारतीय संघ २७० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघांने आयसीसीच्या यादीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय संघ टी२० क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर वनडे क्रमवारीमध्ये देखील दुसऱ्या स्थानी आहे. यासोबतच भारतीय संघ कसोटी क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे.
तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा देखील आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत तीनही क्रिकेट प्रकारात पहिल्या ५ फलंदाजांमध्ये आहे.
टी२० क्रिकेटमध्ये केएल राहुल चौथ्या स्थानी आहे. तर विराट कोहली ५ व्या स्थानी आहे. तसेच आयसीसीच्या वनडे फलंदाजाच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देखील भारतीय फलंदाजांचा दबदबा आहे. विराट कोहली कसोटी फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
युसुफ, युवराजने मिळून केली तब्बल ९ षटकारांची बरसात, चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
भारत-इंग्लंड टी२० मालिकेत दिसले ‘मुंबई कनेक्शन’
INDvENG: पाचव्या टी२० सामन्यात टी नटराजनला का मिळाली केएल राहुल ऐवजी संधी, विराट कोहलीने केला खुलासा