जमैका तलायव्हाजचे प्रतिनिधित्व करत असलेल्या स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल याने कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक केले आहे. रसेलने शुक्रवारी (27 ऑगस्ट) रोजी सेंट लुसिया किंग्सविरुद्धच्या सामन्यात 14 चेंडूत अर्धशतक केले. जे या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
त्याच्या तुफानी खेळीदरम्यान त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वहाब रियाझची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. रसेलने त्याच्या एका षटकात 4 षटकारांसह 32 धावा लुटल्या. रसेलच्या समोर कशी गोलंदाजी करावी हे वहाब रियाझला कळत नव्हते. कारण तो प्रत्येक चेंडू सीमेबाहेर मारत होता.
रसेलने जोरदार फटके मारल्यानंतर गोलंदाज म्हणून वहाबची आकडेवारी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. वहाबने आपल्या कोट्यातील चार षटकेही टाकली नाहीत आणि तीन षटकांत 61 धावा खर्च केल्या. आत्तापर्यंत फ्रँचायझी टी-20 क्रिकेटमध्ये तीन षटकांमध्ये खर्च झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
रसेलने पूर्ण डावात 14 चेंडूत 357.14 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. या डावात त्याने केवळ चौकार आणि षटकारांसह 48 धावा केल्या होत्या. याआधी सीपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम जेपी ड्युमिनीच्या नावावर होता, ज्याने 2019 मध्ये 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
Russell vs Wahab Riaz
— Shubham Sharma (@Shubham73106588) August 27, 2021
याबरोबरच रसेल हा टी-20 इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने दोन वेळा 14 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. यापूर्वी, लंका प्रीमियर लीग 2020 मध्ये कोलंबोकडून खेळताना रसेलने 14 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
रसेलच्या अर्धशतकामुळे जमैकाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 255 धावा केल्या. सीपीएलमधील कोणत्याही संघाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात सेंट लुसिया किंग्स संघ 17.3 षटकांपर्यंतच 135 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांना तब्बल 120 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
मन मे लड्डू फुटा! ड्वेन ब्रावोच्या सीपीएलमधील ‘अशा’ प्रदर्शनानंतर चेन्नई सुपर किंग्ज खूश
‘एकवेळ ४ आंतरराष्ट्रीय कर्णधार एकत्र खेळत होते,’ डू प्लेसिसने सांगितली सीएसकेची विशेषता
झिम्बाब्वेची विजयी सुरुवात, पहिल्या टी२०त आयर्लंडवर ३ धावांनी दणदणीत विजय