भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी विश्वचषकाचा एकप्रकारे सराव असेल. भारताला विश्वचषकापूर्वी एकून सहा टी-20 सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाचे काही प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत, पण भारत त्याच्या सर्वोत्तम खेळाडूंना मालिकेत खेळवेल. ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत एका अशा गोलंदाजाला खेळवणार आहे, जो यजमान संघासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू करणार घातक गोलंदाजी –
ऑस्ट्रेलियन संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्यांचा अष्टपैलू शॉन एबॉट (Sean Abbott) याने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 5 षटकांमध्ये फक्त एक धावा दिली आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने यादरम्यान 4 निर्धाव षटके टाकली. सामन्यात मिचेल स्टार्कची अष्टपैलू खेळी आणि एडम जम्पाच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात न्यूझीलंडला 113 धावांना मात दिली. आता शॉन एबॉट भारताविरुद्ध अशीच चमकदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल.
· W · · W · · · · · · · · · · · · · · · · · · ·
Sean Abbott now has 2-0 after four overs 😯 #AUSvNZ pic.twitter.com/NB6bNwr1Zf
— cricket.com.au (@cricketcomau) September 8, 2022
त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर याला भारताविरुद्धच्या मालिकेवेळी विश्रांती दिली गेली. वॉर्नरला विश्रांती दिली गेली आहे. तर मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि मिचेल मार्श यांना दुखापत झाल्यामुळे ते तिघेही या मालिकेत खेळणार नाहीत. सर्वांचे लक्ष्य कर्णधार एरॉन फिंचवर असेल. फिंचने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आगामी टी-20 विश्वचषकाआधी फिंच चांगला फॉर्म मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच टिम डेविडवर देखील अनेकांच्या नजरा असतील.
टी-20 मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया: शॉन एबॉट, एश्टन एगर, पैट कमिंस, टिम डेविड, नाथन एलिस, आरोन फिंच (कर्णधार), कैमरन ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डेनियल सैम्स, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, एडम जम्पा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: सामन्यापूर्वी भारताच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियन कर्णधार; दिल्या 75व्या स्वातंत्र्याच्या हटके शुभेच्छा
का खास आहे टीम इंडियाची नवी ‘हर फॅन की जर्सी’? वाचा सविस्तर
लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी