गल्ली क्रिकेटमध्ये आपण सर्वांनी अनेकवेळा मुले हरवल्यावर तो चेंडू शोधताना पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही असे घडले, तर आश्चर्य वाटेल. पण, असेच काहीसे इंग्लंड आणि नेदरलंडस यांच्यातील ऍमस्टेल्व्हिन येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वनडेत पाहायला मिळाले. जेव्हा खेळाडू, ग्राउंड स्टाफ आणि प्रसारण टीम देखील चेंडू शोधण्यासाठी झुडुपात उतरली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेदरलंडस विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीसाठी आलेल्या डेविड मलानने ९व्या षटकात पीटर सीलरच्या चेंडूवर षटकार ठोकला की चेंडू थेट स्टेडियमच्या पलीकडे दाट झाडीत गेला. काही वेळातच नेदरलंडचे काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बॉल शोधण्यासाठी झुडपात गेले. पण, बरेच प्रयत्न करूनही चेंडू सापडला नाही. त्यानंतर प्रसारण संघाचा कॅमेरामनही चेंडू शोधण्याच्या मोहिमेत उतरला. यानंतर जेव्हा चेंडू सापडला तेव्हा सर्वजण आनंदाने ओरडू लागले, ज्याने हा व्हिडीओ पाहिला त्याला हसू आवरता आले नाही आणि त्याला रस्त्यावरील क्रिकेटमध्ये घालवलेले दिवस आठवले, चेंडू लागल्यावर दोन्ही संघाचे खेळाडू त्याला कसे शोधू लागले. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी दृश्ये क्वचितच पाहायला मिळतात.
Dawid Malan six ball ends up in the trees. Reminded me of the school days we went about searching the ball while playing cricket 🤣🤣🤣🤣 #NEDvsENG
— Waadaplaya!!! 🏏 (@waadaplaya) June 17, 2022
दरम्यान, डेविड मलान, जोस बटलर आणि फिलीप साल्ट यांनी ताबडतोड शतक ठोकले. तर लियाम लिविंगस्टोनने शेवटच्या षटकांत केवळ २२ चेंडूत ६६ धावा चोपल्या. यांच्या मदतीने इंग्लंड संघाने ५० षटकांत ४९८ धावा केल्या. या आजपर्यंतच्या वनडे क्रिकेट मधील संघाच्या एका डावातील सर्वोच्य धावा आहेत. इंग्लंडने त्यांच्याच २०१८च्या सांघीक सर्वोच्य धावसंख्येचा विक्रम मोडला आहे. त्यांनी हा विक्रम ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सध्या त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे!’, नेहराजींनी रिषभ पंतला फटकारले
‘रिषभच्या जागी ‘या’ खेळाडूला २०१९ मध्ये संधी द्यायला हवी होती’ पंतवर भडकला गौतम गंभीर