पुणे | तळागाळा पर्यंत कब्बडीचा खेळ नेण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पुणेरी पलटण, या विवो प्रो कब्बडी लीग मधील आघाडीच्या संघा तर्फे ‘बोल कब्बडी आंतरशालेय स्पर्धेचे’ आयोजन फिनिक्स मार्केट सिटी मॉल, विमान नगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला आणि पुण्यातील शाळांमधून तब्बल २०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.
या स्पर्धेतील मुलांचे आणि मुलींचे विभागातील विजेता संघ ठरले सातव हाय स्कूल. या स्पर्धेत अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या गटात सर्वश्रेष्ठ रेडर ठरले हर्शल (सातव हायस्कूल) व शिवानी हिंगणे (डी. वाय पाटील स्कूल, पिंपरी) आणि सर्वश्रेष्ठ डीफेन्देर्स मुलांमध्ये ठरले वीरेंद्र प्रताप सिंघ आणि मुलींमध्ये ठरले दिव्या चौधरी.
पुणेरी पलटण बोल कब्बडी आंतरशालेय कब्बडी स्पर्धेतील विजेत्यांना पुणेरी पलटणच्या मार्केटिंग प्रमुख, श्रद्धा नथानी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील त्यांच्या अनुभवा विषयी अधिक जाणून घेत त्यांनी कारकिरदीसाठी क्रीडा क्षेत्र निवडावे यासाठी श्रद्धा नथानी यांनी त्यांना प्रोत्साहित केले. प्रेरीत झालेल्या मुलांनी अधिकाधिक वेळा कब्बडी खेळण्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना, पुणेरी पलटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल म्हणाले, “कब्बडी विषयी जागरूकता निर्माण करत, हा खेळ तळागाळापर्यंत नेण्यासाठी, पुणेरी पलटण मध्ये आम्ही प्रयत्नशील असतो. शालेय स्तरावरील कब्बडीचे सामने आयोजित करून आम्ही मुलांना त्यांच्यातील क्रीडागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक मंच उपलबद्ध करून देतो, जेणेकरून कब्बडी हा क्रीडा प्रकार निवडण्यासाठी त्यांना प्रवृत्त करता येईल. खेळाविषयीची त्यांची आवड आणि कसब पाहता असे नक्की म्हणता येईल, की ही मुले भविष्यात प्रतीस्पर्धांवर #पडेंगे भारी.”
स्पर्धेतील सहभागी खेळाडू संघ आणि त्यांचे प्रशिक्षक, यांनी या उपक्रमाचे अतिशय कौतुक केले. अनेक विद्यार्थयांनी, भविष्यात होणाऱ्या अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. ही स्पर्धा सुरु असताना स्पर्धेचे ठिकाण प्रेक्षकांनी खच्चून भरले होते आणि उत्साही प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या संघाला प्रोहत्साहित करताना दिसत होते. एकंदरीतच वातावरण उत्साहाने भरून गेले होते आणि तिथे हजर असलेल्या पुणेरी पलटणचा शुभांकर – शेरू बरोबर अनेकांनी सेल्फीज सुद्धा काढून घेतल्या.
श्री शिव छत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे-बालवाडीतील पुणेरी पलटणच्या स्पर्धा ऑक्टोबर १८ ते २४, २०१८ दरम्यान खेळल्या जाणार आहेत.