ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याचे म्हणणे आहे की, “भारता विरुद्ध कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात युवा अष्टपैलू कैमरुन ग्रीन असणे चांगले असणार आहे. कारण तो बेन स्टोक्स सारखा खेळाडू आहे.” येत्या १७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बाॅर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्याने हे वक्तव्य केले आहे.
हेझलवूडने सांगितली ग्रीनची उपयुक्तता
जोश हेझलवूड ग्रीनचे कौतुक करताना म्हणाला, “मला वाटते प्रत्येक संघात बेन स्टोक्स सारखा खेळाडू असणे आवडेल, कारण यामुळे संघाला खुप चांगले संतुलन लाभते. याच्यासाठी आम्ही इतकी वर्ष असे खेळाडू शोधत आहोत. ग्रीन खुप मोठी आशा आहे आणि त्याच्यापुढे चांगले भविष्य आहे. जर ही योग्य वेळ त्याला तर घेवून आली. नाहीतर आम्हाला त्याच्याविना भारताला सामोरे जावे लागेल. आम्ही मागील काही वर्षात वेळोवेळी असे केले आहे.”
त्यामुळे रविवारी हेझलवूड म्हणाला,” आमच्या संघाला दुखापतग्रस्त कैमरुन ग्रीनच्या तंदुरुस्त होण्याची कसली ही घाई नाही.” भारतीय संघाविरुद्ध सिडनीत खेळल्या गेलेल्या दुसर्या तीन दिवसीय सराव सामन्यात ग्रीनच्या डोक्याला चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली होती. ज्यानंतर कन्कशन नियमानुसार त्याला सामन्यातून बाहेर केले होते. परंतु ग्रीन म्हणाला होता की, तो ठीक आहे, मात्र त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत शंका आहे.
हेझलवूड म्हणाला, “दिवस-रात्र कसोटी सामन्यात ग्रीनशिवाय आमचा संघ भारताला सामोरे जावू शकतो. परंतु कसोटी मालिकेच्या शेवटी त्याची गरज लागेल. मला वाटते की, गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात आम्ही त्याच्याविना खेळू शकतो मात्र मेलबर्न आणि सिडनी किंवा ब्रिस्बेन मालिकेच्या शेवटी त्याची गरज भासू शकते. त्यावेळी संघात एका अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता असणार आहे.”
संबंधित बातम्या:
– ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचा भारतीय फलंदाजांना इशारा, म्हणाला
– कसोटी मालिका नशिबाने जिंकता येत नाहीत; या खेळाडूने सुनावले टीकाकारांना खडे बोल
– भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात मोठ्या खेळाडूचे पुनरागमन; फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यास सज्ज