सध्या बर्मिंघम येथे राष्ट्रकूल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा सुपुत्र असणाऱ्या संकेत सरगर याने भारताला दिवसातील पहिले पदक मिळवून देले.महाराष्ट्रातील सांगलीचा असलेल्या संकेत महादेव सरगर (Sanket Mahadev Sargar)याने पुरूषांच्या ५५ किलोग्राम वजनी गटाच्या अंतिम फेरीतच स्थान मिळवले नाही तर त्याने उत्तम कामगिरीही केली आहे. त्याने पहिल्या फेरीत स्नॅच या प्रकारात ११३ किलोग्राम वजन उचलले. तर दुसऱ्या फेरीत क्लीन एंड जर्कमध्ये १३५ किलोग्राम वजन उचलत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. संकेतच्या याच कामगिरीची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला आणि त्याच्या प्रशिक्षकांना शासनातर्फे पुरस्कार जाहीर केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या औरंगाबाद अर्थात सध्याचे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी रखडलेल्या विकासकामांची पाहणी केल्यानंतर त्यांंनी पत्रकार परिषदे घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेची आठवण करून देत महाराष्ट्राचा सुपुत्र असणाऱ्या संकेतने मिळवलेल्या पदकाचा अभिमान असल्याचे सांगितले. शिवाय त्याच्या या कामगिरीसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे ३० लाख रुपयांचे आर्थिक बक्षिस आणि संकेतच्या प्रशिक्षकांना ७.५ लाख रुपयांचे आर्थिक बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, सध्या संभाजीनगर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांना चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातून राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी संभाजीनगर येथे क्रिडा विद्यापीठ उभारणार असलल्याचीही घोषणा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील खेळाडूंना मोठ्या स्थरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल महत्वाचे असलल्याचे सांगितले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी निर्णायक खेळी करणारा कार्तिकच म्हणतोय, ‘फिनिशरची भूमिका सोपी नाही!’ वाचा सविस्तर
न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा ‘जादुई’ झेल, डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर पकडला चेंडू- Video
‘पाकिस्तानच्या चुकांची पुनरावृत्ती सध्या टीम इंडिया करत आहे’, माजी दिग्गजाचा दावा