भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेची तयारी म्हणून खेळाडू सराव सामन्यात सहभागी होतात. सराव सामन्यानंतर खेळाडूंना विश्रांती दिली जाते. मात्र मिळालेल्या विश्रांतीमध्येही खेळाडू सरावाची कोणतीही संधी सोडत नाहीत. यादरम्यान अजिंक्य रहाणेच्या सराव करतानाच्या व्हिडिओवर सलामीवीर शिखर धवनने मजेशीर कमेंट केली आहे.
रहाणे खोलीत करतोय सराव
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य राहाणेची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. तो या मालिकेसाठी कसून सराव करतोय. नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली. मात्र, त्यानंतर मिळालेल्या विश्रांतीतही त्याने स्वतः च्या खोलीत फलंदाजीचा सराव केला.
रहाणेने व्हिडिओ केला शेअर
अजिंक्य रहाणेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो स्वत: चेंडू भिंतीवर फेकत आहे आणि भिंतीला लागून परत येणाऱ्या चेंडूवर फलंदाजीचा सराव करत आहे. त्याच्या या सरावामुळे खोलीत आवाज येतोय. त्यामुळे त्याच्या खोलीच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या खेळाडूंना या आवाजाचा त्रास होईल असे त्याला वाटले, म्हणून त्याने शेजारी राहणाऱ्या खेळाडूंची माफी मागितली आहे.
https://www.instagram.com/p/CH-N2zxBiNd/?utm_source=ig_web_copy_link
शिखर धवनने केली मजेदार टिप्पणी
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने अजिंक्य रहाणेच्या या व्हिडिओवर एक मजेदार कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “भाऊ तुला मानलं पाहिजे. एक दिवसाआधीच सराव सामना झाला. त्या सामन्यात तू 50 धावा ठोकल्या. या सरावामुळेच तुला फायदा झाला का? खोलीत आपल्या मुलीबरोबर खेळ.”
रहाणेची ऑस्ट्रेलियामधील कामगिरी
ऑस्ट्रेलियामध्ये अजिंक्य रहाणेने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ८ कसोटी सामन्यांतील एकूण 15 डावांमध्ये 44 च्या सरासरीने 616 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी बनत राशिद खानने ठोकला ‘हेलिकॉप्टर शॉट’, व्हिडिओ जोरदार व्हायरल
बुमराहने केली जडेजाच्या गोलंदाजी शैलीची हुबेहुब नक्कल, पाहा Video
ट्रेंडिंग लेख-
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज
कसोटीतील हे तीन दिग्गज कधीच दिसणार नाहीत भारताच्या निळ्या जर्सीत?