इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) कोरोना व्हायरसमुळे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांनी देशांतर्गत सामने कमीत कमी जुलैपर्यंत पुढे ढकलले आहेत. तर, कोविड १९ या जागतिक साथीच्या रोगामुळे २५ जूनपासून सुरु होणारा भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा स्थगित करण्यात आला आहे.
यामध्ये ४ सामन्यांची वनडे मालिका आणि २ सामन्यांची टी२० मालिका होणार होती. मात्र, द हंड्रेड लीगबाबतच्या अपेक्षा मात्र कायम आहेत. या लीगमध्ये १००-१०० चेंडूंचे सामने होतील.
ईसीबीने शुक्रवारी (२४ एप्रिल) जाहीर केले की, “कोविड १९च्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारातील सामने जुलैपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. तसेच, काऊंटी क्रिकेटचा हंगाम पुढे ढकलण्यात येण्याचा अर्थ असा की, त्याच्या स्वरूपातही बदल होऊ शकतो.”
ईसीबीची (England and Wales Cricket Board) यावर्षीची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण द हंड्रेड (The Hundred) ही स्पर्धा अजूनही प्रस्तावित आहे. १००-१०० चेंडूंचे सामने असणारे ही लीग, आयपीएल जशी होते तशीच आहे. यात ८ संघ भाग घेतील.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन (Tom Harrison) यांनी सांगितले की, “बोर्डाच्या मिटिंगमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. पण द हंड्रेड लीगवर जास्त चर्चा झाली नाही. यावर बुधवारी योग्य तो निर्णय घेण्यात येईल.”
“द हंड्रेड ही क्रिकेटला पुढे घेऊन जाणारी लीग आहे. याबाबत घाईमध्ये निर्णय घेता येऊ शकत नाही. हे निश्चित आहे की, कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) ही लीग आधी प्रस्तावित केलेल्या मार्गाने होऊ शकत नाही. पण, शक्यता आहे की या लीगमधील सामने परदेशी खेळांडूविना घेतले जातील. जर असे झाल्यास, हे सामने प्रेक्षकांविनाही घेण्यात येण्याची संभावना आहे,” असेही हॅरिसन पुढे म्हणाले.
इंग्रजी माध्यमांतील काही वृत्तांनुसार, जुलैमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारी वनडे आणि टी२० मालिकाही स्थगित करण्यात आली आहे. ही मालिका २ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. इंग्लंडला ऑस्ट्रेलियाबरोबर ३ ते १६ जुलैपर्यंत ३ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये ८ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव खेळाडू
-आता एबी-विराट खेळणार कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्त्वाखाली
-केदार कधीच नाही खेळू शकत कसोटी, भज्जी- रोहितने सांगितले कारण