चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला २७ धावांनी पराभूत करत आयपीएल २०२१ चे विजेतेपद पटकावले. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाचे हे चौथे जेतेपद आहे. या सामन्यावेळी सीएसकेच्या चाहत्यांसोबतच खेळाडूंच्या परिवारातील सदस्य देखील संघाच्या समर्थनार्थ स्टेडियमवर उपस्थित होते. धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा हे देखील संघाला आधार देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. चेन्नईच्या विजयानंतर धोनीची पत्नी आणि मुलगी मैदानावर पोहोचले आणि धोनीला मिठी मारली. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.
यापूर्वी, जेव्हा चेन्नई सुपर किंग्स जिंकली तेव्हाही दोघे खूप आनंदात दिसत होते. धोनीच्या लहानग्या झिवाने संपूर्ण सामन्यात संघाचा झेंडा घेऊन जल्लोषही साजरा केला होता.
चेन्नईच्या विजयानंतर धोनीची पत्नी साक्षी रावत ही मुलगी झिवासह मैदानावर पोहोचते. सीएसके संघाच्या विजयामुळे दोघीही खूप आनंदी दिसतात. धोनीला मैदानावर पाहताच साक्षीने त्याला कडकडून मिठी मारली. धोनीनेही आपली मुलगी आणि पत्नीला मिठी मारून आनंद व्यक्त केला. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू सुरेश रैनाची पत्नीही मैदानावर पोहोचली आणि सर्वांनी ग्रुप फोटोसाठी पोजही दिली.
https://www.instagram.com/p/CVD6Ia_By-5/?utm_source=ig_web_button_share_sheet
The #SuperCham21ons Moment 😍#CSKvKKR #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/CfgcSsJISg
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 15, 2021
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने १९२ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर फाफ डु प्लेसिसने ८६ धावांची शानदार खेळी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. याशिवाय ऋतुराज (३२), रॉबिन उथप्पा (३१) आणि मोईन अली (३७) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण पहिला गडी बाद झाल्यानंतर सीएसकेने केकेआरला पुन्हा सावरण्याची संधी दिलीच नाही.
केकेआरचे खेळाडू गडी बाद होण्याच्या दबावाखाली आले आणि त्यांनी निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १६५ धावाच करू शकले. यासह, सीएसके संघाने हा सामना जिंकला आणि आयपीएल चषकही आपल्या नावे केला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटमध्ये होणार द्रविड युगाचा आरंभ; बीसीसीआयने केले शिक्कामोर्तब
IPL 2021: फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह फाफ बनला सामनावीर, ‘हे’ आहेत याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’
ऐसा पेहली बार हुआ, इन चौदह सालों में! आयपीएल २०२१च्या उपविजेत्या केकेआरचा कोणालाही न जमलेला विक्रम