भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत रविवारी (१२ जून) कटकच्या बाराबती स्टेडियम येथे दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. यजमान भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. भारतीय संघाने दिल्ली येथे झालेला पहिला टी२० सामना ७ विकेट्सने गमावला होता. अशात आता कटकमधील सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्यावर भारतीय संघाचे लक्ष असेल. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मोठा सल्ला दिला आहे.
युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्याबद्दल वेंगरसकरांनी (Dilip Vengsarkar) वक्तव्य केले आहे. सध्या उमरानची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची वेळ आली असल्याचे वेंगसकर यांचे म्हणणे आहे.
आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्त्व करताना मलिकने प्रभावी प्रदर्शन केले. त्याने सातत्याने वेगवान मारा करत फलंदाजांना अडचणीत टाकले. त्याच्या प्रभावी प्रदर्शनाच्या जोरावरच त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa vs India) भारतीय संघात जागा देण्यात आली आहे. नेट्समध्ये वेगवान गोलंदाजी केल्यानंतरही द्रविडने (Rahul Dravid) पहिल्या टी२० सामन्यात जम्मू-काश्मीर एक्सप्रेसला संधी दिली नव्हती.
‘खलीज टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत वेंगसकर (Dilip Vengsarkar Advice To Rahul Dravid) म्हणाले की, “मलिकला खेळण्याची संधी न देत भारतीय संघ एका महत्त्वाच्या खेळाडूवर दुर्लक्ष करत आहे. खेळाप्रती प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु मला वाटते की, आयपीएलमध्ये त्याने ज्याप्रकारे गती आणि अचूकतेसह गोलंदाजी केली होती, ती कौतुकास्पद होती. त्यातही जर भारतीय संघ आपल्याच भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असेल, तर मलिकसारख्या खेळाडूला पारखण्याची हीच योग्य वेळ असेल.”
“मी गेल्या १० वर्षांपासून मलिकपेक्षा चांगली वेगवान गोलंदाजी पाहिलेली नाही. मला अपेक्षा आहे की, तो भारतीय संघासाठी खेळेल आणि चांगले प्रदर्शनही करेल. तो खूप फिट आहे आणि त्याच्याकडे वेगवान गोलंदाजांसाठी आवश्यक आक्रमक्रताही आहे. त्याच्याकडे गती आणि अचूकता आहे. मला वाटते की, तो भारतीय संघासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळेल,” असेही वेंगसरकरांनी म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिक नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल भारतीय संघासाठी सर्वात मोठा गेमचेंजर, माजी कर्णधाराचा दावा
भारतीय क्रिकेटर्सशी लग्नगाठ बांधणाऱ्या अभिनेत्री, ज्यांनी विवाहानंतर बॉलिवूडला ठोकला रामराम