भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी त्यांच्या दुसऱ्या डावात १४८ षटकांमध्ये सर्वबाद ४६६ धावा केल्या असून इंग्लंडवर ३६८ धावांनी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा अजिंक्य रहाणेच्या आधी पाचव्या क्रमांकावार खेळण्यासाठी मैदानात आला. पण तो एकदा पुन्हा संघासाठी चांगली खेळी करण्यामध्ये अपयशी ठरला. दरम्यान त्याने एक चुकीचा निर्णयही घेतला.
जडेजाने पुन्हा केले निराश
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सलामीवीर रोहीत शर्माच्या शतकी खेळीनंतर भारतीय संघ सामन्यात मजबूत स्थितीत होता. चौथ्या दिवशी मैदानात खेळणाऱ्या विराट पायचित झाला. त्याला संघाने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी देऊनही त्याला काही खास करता आले नाही. तो केवळ १७ धावांवर बाद झाला.
जडेजाचा रिव्ह्यू घेण्याचा निर्णय ठरला चुकीचा
जडेजा १७ धावांवर फलंदाजी करत असताना ख्रिस वोक्सचा एक चांगला चेंडू आतमध्ये वळला. जडेजाला तो चेंडू समजाला नाही आणि तो पायचित झाला. पंचांनी बाद घोषित केल्यानंतरही जडेजा या निर्णयाशी असहमत होता आणि त्याने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, रिव्ह्यू घेतल्यानंतरही तो बाद असल्याचेच समोर आले. अशाप्रकारे त्याने भारतीय संघाचा एक महत्वाचा रिव्ह्यू वाया घालवला. यावरुन जडेजा दिवसेंदिवस भारतीय संघासाठी कमजोरी बनत असल्याचे दिसत आहे.
Woakes strikes early for England, trapping Jadeja in front of the stumps.
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Jadeja #Woakes pic.twitter.com/YUUscIbmHQ
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 5, 2021
भारतीय कर्णधार विराट कोहली अपयशी ठरुनही सातत्याने जडेजावर विश्वास दाखवत आहे. त्याने आतापर्यंतच्या चारही कसोटी सामन्यांमध्ये जडेजाला खेळवले आहे. मात्र जडेजा त्याच्या विश्वासावर खरा उतरु शकलेला नाही. केवळ फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीतही त्याने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटने जडेजाच्या जागी आर अश्विनला खेळवण्याचा सल्ला बऱ्याचशा क्रिकेट जाणकारांनी दिला आहे. अशात ४ सामन्यांतील जडेजाची सरासरी आकडेवारी पाहिल्यानंतरही पाचव्या सामन्यात विराट त्याच्याविषयी विचार करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अगग! स्वत: पंतनेही सोडली होती आशा; पण झालं असं काही की, तिघे मिळूनही करु शकले नाहीत धावबाद
शतक झळकावल्यानंतर ‘हिटमॅन’ रोहितला ओव्हलच्या मैदानावर मिळाला विशेष सन्मान, पाहा फोटो