चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रात्री कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. या विजयानंतर प्रत्येकजण चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि त्याच्या संघाचे कौतुक करत आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही धोनी आणि त्याच्या संघाचे कौतुक केले आहे. मात्र, सोशल मीडियावर वॉर्नरच्या या स्तुतीचे चाहते वेगवेगळे अर्थ घेत आहेत.
हैदराबाद संघातून वॉर्नरला वगळले
आयपीएल २०२१ च्या सुरुवातीला वॉर्नर संघाचा कर्णधार होता. परंतु, त्यानंतर खराब फॉर्ममुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला त्याच्या जागी संघाचा नवीन कर्णधार बनविले गेले. यानंतर, आयपीएल २०२१ च्या यूएई टप्प्यातील काही सामन्यांनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. आयपीएल २०२१ चा अंतिम सामना सुरू होण्याआधीच वॉर्नरने एक पेंटिंग पोस्ट केली होती ज्यात वॉर्नर आणि त्याची मुलगी चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीमध्ये दिसत होते.
त्याने इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र पोस्ट केलेले. तसेच, ट्विटरवर त्याची एक लिंक शेअर केलेली. त्याने लिहिले, ‘मला माहित नव्हते की आज रात्री कोणाला पाठिंबा द्यायचा. पण मी या चाहतीला नाही म्हणू शकत नाही. जीने मला हे पोस्ट करण्यास सांगितले!!’ मात्र, वॉर्नरने नंतर ती पोस्ट डिलीट केली.
https://www.instagram.com/p/CVDwvgHBcZs/?utm_source=ig_web_button_share_sheet
चेन्नईचे केले अभिनंदन
चेन्नईने अंतिम सामन्यात विजय मिळविल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले. त्याने लिहिले ‘वेलडन सीएसके आणि धोनीबद्दल तर काय बोलणार?’ तसेच त्याने इंस्टाग्रामवर देखील एक छायाचित्र शेअर केले ज्यामध्ये सर्व सुपरहिरो धोनीला नमन करत आहेत.
Well done CSK a great win and what can you say about @msdhoni
— David Warner (@davidwarner31) October 15, 2021
वॉर्नरच्या या ट्विट आणि पोस्टमुळे अनेक चाहते तो पुढील वर्षी चेन्नईसाठी खेळणार असल्याचे कयास लावत आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघातून बाहेर गेल्यानंतर त्याने आपण यापुढे या संघासाठी खेळणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता पुढील हंगामात तो कोणत्या संघासाठी खेळेल हे पाहणे रंजक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग: भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराचे अवघ्या २९ व्या वर्षी निधन
वाढदिवस विशेष- सहा चेंडूत सहा षटकार खेचणाऱ्या शार्दुल ठाकुरविषयी काही खास माहिती
भारतीय क्रिकेटमध्ये होणार द्रविड युगाचा आरंभ; बीसीसीआयने केले शिक्कामोर्तब