लंडन। शनिवार, 14 जुलैला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीला थेट लग्नाची मागणी घातली आहे.
याचा व्हिडिओही सामन्यादरम्यान टेलिव्हिजन स्क्रिनवर दाखवण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झाला आहे.
त्या व्यक्तीने सामना पाहत असताना अचानक त्याच्या गुडघ्यावर बसुन प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. त्याला पाहुन तिला आश्चर्य वाटले. पण त्यानंतर तिने त्याच्या मागणीला होकार दिला. त्यामुळे त्याने तिच्या बोटात आंगठी घातली.
Marriage decision 'pending'… 🤔😂
…and she said YES‼ @BumbleCricket plays matchmaker at @HomeOfCricket
Congratulations to Charan and Pavan!! 👏🎉🤵👰🎉👏 pic.twitter.com/5MzmfeOs5a
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 14, 2018
Oh wow. First televised proposal at Lord’s and Bumble is all over it 😂😍🏏 #ENGvIND pic.twitter.com/R2wsHab1wS
— Kalika Mehta (@Journo_K) July 14, 2018
This Happened Just Now at Lord's
via @emclub77 pic.twitter.com/UIDadtTdsw
— Cricketopia (@CricketopiaCom) July 14, 2018
मात्र हे दोघे कोण आहेत याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे ब्राडकास्टरने जोपर्यंत त्या व्यक्तीची प्रेयसी त्याला होकार देत नाही असे दिसत होते तोपर्यंत स्क्रीनवर “डिसीजन पेंडिंग” असे दाखवले तर ती हो म्हटल्यावर “होय तीने होकार” दिलायं असे दाखवले.
यामुळे त्या दोन प्रेमी युगुलाबरोबरच ब्राडकास्टरच्या वाट्यालाही कौतूक आले आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना 30 षटकापर्यंत इंग्लंडकडून जो रुट आणि इयान मोर्गनने अर्धशतक केले आहे. तर भारताकडून कुलदिप यादवने 3 विकेट्स घेतल्या आहेत.