भारताचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या भारतीय संघासोबत टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळण्यात व्यस्त आहे. भारतानं खेळलेल्या 3 सामन्यात त्यानं आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तत्पूर्वी फादर्स-डे च्या दिवशी हार्दिकनं त्याच्या मुलासोबतचा एक व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. परंतु आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, त्याच्या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच दिसली नाही.
मागील काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा स्टॅनकोविच एकमेकांपासून वेगळे होण्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट, बातम्या चाहत्यांकडून व्हायरल केल्या गेल्या आहेत. परंतु हार्दिक आणि नताशा या दोघांनीही या गोष्टींवर अजून काही वक्तव्य केलं नाही. परंतु मागच्या काही दिवसात त्या दोघांबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत.
View this post on Instagram
हार्दिक पांड्यानं त्याच्या इंस्टग्रामवर त्याच्या मुलासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याची पत्नी नताशा दिसली नाही आणि तिनं त्या पोस्टवर काही प्रतिक्रिया दिली नाही. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. परंतु त्यावेळी दोघांनी केविड असल्यामुळे सेलिब्रेशन केल नव्हतं. त्यानंतर त्यांनी उदयपुर मध्ये पुन्हा त्यांच्या लग्नाचं सेलिब्रेशन केलं. त्यावेळी क्रिकेटचे अनेक दिग्गज खेळाडू आणि सेलिब्रेटी सामिल झाले होते.
हार्दिक आणि नताशा अजून एकमेंकापासून वेगळे झाले नाहीत. याआधी नताशानं तिच्या इंस्टाग्रामवरुन हार्दिक सोबतचे असणारे फोटो डिलीट केलं होतं. परंतु तिनं नंतर ते फोटो स्टोरी करुन ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाल्या की, दोघांमध्ये सर्वकाही ठीक आहे. परंतु हार्दिकनं इंस्टाग्रामवर त्याच्या मुलासोबत पोस्ट केलेल्या व्हिडीओवरुन चर्चांना उधाण आलं आहे की, हार्दिकनं या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचवर दुर्लक्ष केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांग्लादेशनं पुन्हा केली बेईमानी! डीआरएससाठी घेतली ड्रेसिंग रूमकडून मदत; अंपायरचीही साथ मिळाली
सुपर 8 सामन्यांसाठी भारतीय संघात बदल आवश्यक, या मॅचविनर खेळाडूला मिळू शकते संधी
‘मॅन वर्सेस वाइल्ड’ फेम बियर ग्रिल्सनं हाती घेतली बॅट! क्रिकेटच्या मैदानावर केली जोरदार फटकेबाजी