यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 19वा सामना आज (9 जून) रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जात आहे. हा सामना न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. तत्पूर्वी पाकिस्ताननं टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं.
भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना मात्र 119 धावा केल्या. विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीवर सर्वांची नजर होती परंतु कोहली स्वस्त:त तंबूत परतला. भारतासाठी यष्टीरक्षक रिषभ पंतनं 31 चेंडूत सर्वाधिक 42 धावा ठोकल्या यादरम्यान त्यानं 6 चौकार लगावले. तर अक्षर पटेलनं 18 चेंडूत 20 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 2 चौकारांसह 1 उत्तुंग षटकार देखील लगावला. कर्णधार रोहित शर्मानं 12 चेंडूत 13 धावांची खेळी खेळली. अन्य कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.
पाकिस्तानसाठी हरीस रौफ आणि नसीम शाह यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. तर मोहम्मद अमीरनं उत्कृष्ट गोलंदाजी करत 2 बळी त्याच्या नावी केले. शाहीन आफ्रीदीच्या हाती फक्त 1 विकेट लागली. या खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी खूप मदत आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जास्तवेळ खेळपट्टीवर टिकून दिलं नाही.
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 12 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यावेळी भारतानं 9 सामन्यात बाजी मारली आहे. तर पाकिस्तान संघ केवळ 3 सामन्यांवरच वर्चस्व गाजवू शकला. यादरम्यानं भारतासाठी विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वाधिक 488 धावा ठोकल्या आहेत. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवानंनं सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. परंतु आजच्या सामन्यात पाकिस्तान 120 धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग करतं हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान(यष्टीरक्षक), बाबर आझम(कर्णधार), उस्मान खान, फखर झमान, शादाब खान, इफ्तिकार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रीदी, हरीस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्ताननं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11यंदाच्या टी20 विश्वचषकात ‘या’ 3 दिग्गजांमध्ये होणार रेकाॅर्डसाठी लढाई
शेवटच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ‘किंग’ कोहलीचा जलवा पाहा व्हिडिओ