पुणे : पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत साखळी फेरीत किड्स गटात ऍव्हेंजर्स, गार्डीयन्स या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत किड्स गटात पहिल्या लढतीत अनय इंगळहळीकर(5मि.) याने नोंदवलेल्या एक गोलाच्या जोरावर गार्डीयन्स संघाने शिल्ड संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या लढतीत ऍव्हेंजर्स संघाने गार्डीयन्स संघाचा 3-0 असा सहज पराभव केला. ऍव्हेंजर्स संघाकडून विहान राठोड(2, 9मि.) याने दोन गोल, तर आरुष दिवेकर(15मि.) याने एक गोल केला.
खुल्या गटात पहिल्या लढतीत फाल्कन्स संघाने वॉरियर्स संघाचा 5-4 पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून करण बापट(5, 15मि.), अभिषेक जैन(10,26मि.)यांनी प्रत्येकी दोन गोल, हर्षवर्धन थिटे(25मि.) याने एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वॉरियर्सकडून गिरीराज खोदडे(2, 9मि.)याने तीन गोल, तर क्षितीज(20मि.), शुभांकर भजेकर(22मि.) याने एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात विश्व रिकरी(3,9,25मि.)याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर स्ट्रायकर्स संघाने निंजाज संघाचा 4- 1 असा पराभव केला.
अन्य लढतीत प्रभांश मथरू(2,7,10,19मि.)याने नोंदवलेल्या चार गोलांच्या जोरावर ग्लॅडिएटर्स संघाने फाल्कन्स संघाचा 8-1 असा पराभव केला.
निकाल: साखळी फेरी: किड्स गट:
गार्डीयन्स: 2(अनय इंगळहळीकर 5मि., स्वयंगोल 15मि.) वि.वि.शिल्ड: 1(अगस्त्य कुंटे 14मि.)
ऍव्हेंजर्स: 3(विहान राठोड 2, 9मि., आरुष दिवेकर 15मि.) वि.वि.गार्डीयन्स: 0;
खुला गट:
फाल्कन्स: 5(करण बापट 5, 15मि., अभिषेक जैन 10,26मि., हर्षवर्धन थिटे 25मि.)वि.वि.वॉरियर्स: 4(गिरीराज खोदडे 2, 9मि.,क्षितीज 20मि., शुभांकर भजेकर 22मि.); सामनावीर – रिधिमा रुकारी
स्ट्रायकर्स: 4(विश्व रिकरी 3,9,25मि., यश भिडे 16मि.) वि.वि.निंजाज: 1(तनिश दादलाणी 12मि.); सामनावीर –
ग्लॅडिएटर्स: 8(प्रभांश मथरू 2,7,10,19मि., क्रिश कासट 5,8मि., सिद्धार्थ भोळे 16,29मि.) वि.वि. फाल्कन्स: 1(तनिश बेलगलकर 24मि); सामनावीर -प्रभांश मथरू.