भारतीय संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूं सोबतच इतर सहकाऱ्यांना देखील भारतीय संघासोबत नेहमीच राहावे लागते. सध्या कोरोनाच्या नियमामुळे क्रिकेटमध्ये खूप बदल झाले आहे. ज्यामध्ये खेळाडूंसोबतच इतर संघ सहकाऱ्यांना देखील विलगीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी सर्वांना त्यांच्या घरापासून कित्येक दिवस लांब राहावे लागते. त्यामुळे आपल्या परिवारातील सदस्यांची आठवण येणे, हे सहाजिकच आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील त्यांच्या परिवारातील सदस्यांची सध्या आठवण येत आहे. ज्यामध्ये यॉर्कर, बाउन्सर, बीमर, फ्लीपर आणि स्किपर यांची शास्त्रींना आठवण येत आहे. हे कोणत्या गोलंदाजीचे प्रकार नाही, तर हे शास्त्रींच्या पाळीव श्वानांची नावे आहेत.
याबाबत शास्त्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या श्वानांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हे सर्व श्वान त्यांचे खाद्य खात आहेत. यावर शास्त्रींनी “माझ्या मित्रहो, बाउन्सर, बीमर, फ्लिपर, स्किपर आणि यॉर्कर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एका खुल्या वातावरणात आपले खाद्य खात आहेत. मला तुमची आठवण येत आहे. आपण लवकरच भेटू”, असे कॅप्शन देखील लिहिले आहे.
My buddies Bouncer, Beamer, Flipper, Skipper, Yorker tucking in to their lunch on a rare sunny day on the west coast in India 🇮🇳. Miss you guys . See you soon 🤗 pic.twitter.com/lA8XC9P0eb
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) August 23, 2021
दरम्यान, ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २ कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघ ०-१ ने आघाडीवर आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाला तब्बल १५१ धावांनी परास्त केले होते. यामुळे भारतीय संघ सध्या या मालिकेत मजबूत स्थितीत आहे.
भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात पोहोचला आहे. तिथे भारतीय संघाच्या सराव सत्रात देखील सुरुवात झाली आहे. याबाबत भारतीय नियामक मंडळने (बीसीसीआय) सोशल मीडियावर याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान इंग्लंड संघासाठी दुःखद बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतग्रस्त झाला आहे. ज्यामुळे वूडने तिसऱ्या कसोटी सामन्यातून नाव मागे घेतले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
–वयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी
–तिसऱ्या कसोटीत आर अश्विनला मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी, जाणून घ्या काय आहे कारण
–एकेकाळी ज्याच्याबरोबर झाला होता वाद, आज तोच खेळाडू उतरला जस्टीन लँगरच्या समर्थनार्थ