सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाकडून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आमि मोहम्मद शामी सारख्या खेळाडूंना विश्रांती दिल्याकारणाने ही मालिका चर्चेत आहे. अशातच कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे गेले आहे. या मालिकेत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेवर मात करत विक्रमाची नोंद करण्याची संधी उपलब्ध आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय (India) संघाला पाकिस्तानचा विक्रम मोडण्याची संधी असेल. या मालिकेत टीम इंडियाने तीन सामने जिंकले तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याच्या बाबतीत ते पाकिस्तानला (Pakistan) मागे टाकेल.
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० सामने जिंकण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी १५ पैकी ९ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या यादीत पाकिस्तान (Pakistan) आणि इंग्लंड (England) भारताच्या पुढे आहेत, त्यांनी दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी ११ वेळा पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक १४ टी२० सामने जिंकले आहेत. ती बरोबरी करण्यासाठी भारताला मालिका ५-० ने जिंकावी लागेल.
दरम्यान, भारताने आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. हा सामना २००६ मध्ये जोहान्सबर्ग येथे झाला होता. त्या सामन्यात १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक चेंडू राखून ६ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने २०१५ मध्ये पहिल्यांदा ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली होती. या मालिकेत भारताला २-० ने पराभव पत्कारावा लागला होता. याशिवाय सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या मालिकेचा निकाल १-१ अशा बरोबरीत लागला होता.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लॉर्ड्स कसोटीतील विजयासह इंग्लंडला टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये फायदा, टीम इंडिया ‘या’ क्रमांकावर
सचिन कुकला मागे टाकत कुकने रचलाय इतिहास, असं करणारा जगातील पहिला खेळाडू
विराट मोडणार सचिनच्या १०० शतकांचा विक्रम?, पाहा काय म्हणतायेत रोहितचे प्रशिक्षक