भारतात कोविड-१९ या महामारीने हाहाकार माजवला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारतभर लसीकरणही सुरु आहे. सध्या देशात वयवर्ष १८ च्या पुढील लसीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे शनिवारी (०८ मे) भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबद्दल त्याने स्वत: सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. काही दिवसांपुर्वीच भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही कोरोनाची लस घेतली होती.
लस घेतनाचा आपला फोटो रहाणेने ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोत रहाणे आणि त्याला लस देणाऱ्या डॉक्टर मास्क घातलेल्या दिसत आहेत. या फोटोवर कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. मी सर्वांना विनंती करतो की, आपण पात्र असल्यास कोरोना लसीसाठी नोंदणी करावी आणि लवकरात लवकर कोरोनाची लस घ्यावी.’
धवननंतर कोरोनाची लस टोचवून घेणारा रहाणे कदाचित दुसराच सक्रिय भारतीय क्रिकेटपटू असावा. त्याच्यापुर्वी गुरुवार, ५ मे रोजी धवनने कोरोनाची लस घेतली होती. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लस घेतली होती. त्यावेळी ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत होती. सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली आहे.
Got my first dose of the vaccine today. I urge everyone to register and get yourself vaccinated, if you’re eligible pic.twitter.com/VH2xYcTQ1i
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) May 8, 2021
घरी परतल्यावर दुसऱ्याच दिवशी घेतली लस
मराठमोळ्या रहाणेने घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरोनाची लस घेतली आहे. ७ मे रोजी तो घरी पोहोचला होता. अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका रहाणेने याबद्दल माहिती दिली होती. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पती रहाणे, मुलगी आर्या आणि आपला फोटो शेअर करत तिने रहाणेच्या आगमनाची माहिती दिली होती. ‘आर्याचे बाबा घरी आले आहेत,’ असे ट्विट करत तिने यावेळी ट्विट केले होते.
अजिंक्य रहाणेची आयपीएलमधील कामगिरी
अजिंक्य रहाणेच्या आयपीएल २०२१ मधील कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, या हंगामात त्याला फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यातही तो फक्त ८ धावा करु शकला. तसे तर, रहाणेची आयपीएल कारकिर्दीतील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. परंतु मागील वर्षापासून त्याला माफक संधी मिळत नसल्याचे दिसत आहे.
आयपीएल २०१२ मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले होते. या हंगामात १६ सामने खेळताना त्याने ५६० धावा कुटल्या होत्या. दरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतकेही केली होती. तसेच २०१२-१९ या कालावधीत दर आयपीएल हंगामात त्याने ३०० धावांचा आकडा पार केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर धवनने घेतली कोरोनाची लस; फोटो शेअर करत म्हणाला…
धोनी तो धोनीचं, ‘ते’ कौतुकास्पद कार्य एकटा ‘कॅप्टनकूल’च करु शकतो; माजी क्रिकेटरने केली स्तुती
कोहली, धवन की अजून कोणी; टी२० विश्वचषकात रोहितचा सलामी जोडीदार कोण असेल?