इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामावरील संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाच्या सावटाखाली बंद दाराआड आयोजन्यात आलेल्या या हंगामातून आतापर्यंत ४ क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे. भारतातील कोरोनाचा वाढता प्रकोप हे यामागचे मुख्य कारण ठरले आहे. आता याच कारणास्तव अजून २ दिग्गज परदेशी क्रिकेटपटू आयपीएलचा चौदावा हंगाम अर्ध्यात सोडून स्वदेशी परतू शकतात.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ हंगामाच्या अर्ध्यातून ऑस्ट्रेलियाला परतू शकतात. यापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या ३ क्रिकेटपटूंनी उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू ऍडम झम्पा, केन रिचर्डसन आणि राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यू टाय यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ९ न्यूजमधील वृत्तानुसार, वॉर्नर आणि स्मिथसह इतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाच्या सीमा बंद होण्याच्या कारणामुळे मायदेशी परतण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर, क्रिकेटपटूंव्यतिरिक्त प्रशिक्षक, समालोचक आणि इतर पदभार सांभाळत आयपीएल २०२१ चा भाग असलेले ३० ऑस्ट्रेलियन सदस्य भारत सोडण्यासाठी इच्छुक आहेत. असे झाल्यास, आयपीएलला मोठा धक्का बसू शकतो.
त्याचही हैदराबाद संघ हंगामातील ५ सामने खेळत केवळ एका विजयासह गुणतालिकेत तळाशी आहे. त्यामुळे आधीपासूनच पिछाडीवर असलेल्या हैदराबाद संघाची स्वत” कर्णधारानेच अर्ध्यातून साथ सोडली, तर संघाची डोकेदुखी वाढू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: जॉर्डनने दोन षटकार मारल्याने चिडला प्रसिद्ध कृष्णा, विकेट घेतल्यानंतर दाखवली ‘दादागिरी’!
नव्या वादाला आमंत्रण! भर सामन्यात डगआऊटमधून मॉर्गनला इशारा, कोडवर्डमध्ये दिले गेले सल्ले
काय डोकं लावलंय! यष्टीरक्षकाचं लक्ष विचलित करण्यासाठी फलंदाजाने नकळत फेकली बॅट अन् वाचवली विकेट