इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) च्या १५ व्या हंगामात अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. त्यामध्ये नुकताच ऑस्ट्रेलियाचा २०२१ वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू (Best player of the year) हा पुरस्कार जिंकणारा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क(mitchell starc) हा सुद्धा लिलावात सहभागी होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शेवटच्या क्षणी २०२२ च्या आयपीएल मेगा लिलावातून त्याने माघार घेतली आहे. तो २०१५ नंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला नाही. स्टार्कला २०१८ मध्ये कोलकत्ता संघाने खरेदी केले होते पण दुखापतीमुळे त्याला संघात खेळता आले नाही.
एका क्रिडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मिचेल स्टार्क म्हणाला, “मी आयपीएल २०२२ मेगा लिलावात प्रवेश करण्यासाठी फक्त एक पाऊल दुर होतो. पण, मी तसे केले नाही. मला बायो-बबलमध्ये वर्षातील २२ आठवड्यांचा वेळ घालवायचा नाही. मला ऑस्ट्रेलियासाठी जास्तीत जास्त खेळायचे आहे.”
पुढे मिचेल स्टार्क म्हणाला की, “एक वेळ येईल जेव्हा मला आयपीएलमध्ये पुन्हा खेळायला आवडेल. परंतु, ऑस्ट्रेलियासाठी खेळणे ही माझी पहिली पसंती असेल. मी काही काळासाठी घेतलेला हा निर्णय आहे. मी एकहून अधिक प्रकारांमध्ये खेळतो. माझ्या या निर्णयामुळे पत्नी आणि कुटूंबासोबत वेळ घालवायला अतिरीक्त वेळ मिळेल.”
३२ वर्षीय मिचेल स्टार्कने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (RCB) कडून खेळताना आतापर्यंत केवळ दोन सत्रांमध्येच त्याने २७ सामन्यांत ३७ विकेट्स घेतल्या आहेत. २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कवर ९.४ कोटी रुपयांची बोली लावली होती. पण हंगाम सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावे लागले.
२०२०-२१ च्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर त्याला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. या मालिकेत त्याने ४०.७२ च्या सरासरीने केवळ ११ विकेट घेतल्या. तसेच त्याने ऍशेस मालिकेत दमदार कामगिरी करत पुनरागमन केले. २५.३७ च्या सरासरीने १९ बळी घेतले आणि संघाला संस्मरणीय विजय मिळवून देण्यास मदत केली.
महत्वाच्या बातम्या-
लखनऊ सुपरजायंट्सच्या लोगोची रंजक कहाणी; पुराणातील दाखले आणि आधुनिकतेचा साज (mahasports.in)
‘दीपक चहर असेल मेगा लिलावात सर्वात महागडा भारतीय गोलंदाज” (mahasports.in)