आयपीएल 2024 च्या 40व्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतनं 43 चेंडूत 88 धावांची विस्फोटक खेळी खेळली. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. तर अक्षर पटेलनं 43 चेंडूत 66 धावांचं योगदान दिलं. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय शेवटच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सनं शानदार फलंदाजी करत 7 चेंडूत 26 धावा ठोकल्या.
दिल्लीसाठी ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी शेवटच्या 4 षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली. दिल्लीनं शेवटच्या 24 चेंडूत 97 धावा केल्या. ऋषभ पंतनं मोहित शर्माच्या 20 व्या षटकात 31 धावा ठोकल्या, ज्यामध्ये सलग 3 षटकारांचा समावेश आहे. तर त्या आधीच्या 19व्या षटकात साई किशोरनं 22 धावा दिल्या. अशाप्रकारे दिल्लीनं शेवटच्या 12 चेंडूत 53 धावा मारल्या. मोहित शर्मानं 4 षटकात 73 धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळाला नाही. दिल्लीसाठी ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यात अवघ्या 68 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नव्हती. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क 14 चेंडूत 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पृथ्वी शॉ 7 चेंडूत 11 धावा करून आऊट झाला. शाई होप ६ चेंडूत फक्त ५ धावाच करू शकला. एकवेळ दिल्ली कॅपिटल्सची अवस्था 5.4 षटकांत 44/3 अशी होती. मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेलनं डाव सांभाळला आणि दिल्लीला अडचणीतून बाहेर काढलं.
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, संदीप वारियर सर्वात यशस्वी ठरला. त्यानं दिल्लीच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवलं. याशिवाय नूर अहमदला 1 विकेट मिळाली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
गुजरात टायटन्स – ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर
इम्पॅक्ट प्लेअर्स – शरथ बीआर, साई सुदर्शन, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अॅनरिक नॉर्किया, खलिल अहमद, मुकेश कुमार
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुमित कुमार, रसिक दार सलाम, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव
महत्त्वाच्या बातम्या –
उसेन बोल्ट 2024 टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर, आयसीसीची मोठी घोषणा
मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यानं आतापर्यंत केल्या ‘या’ 4 मोठ्या चुका, जाणून घ्या सविस्तर
आयपीएल 2024 मध्ये कांगारू फलंदाज तुफान फार्मात! टी20 विश्वचषकासाठी सर्व संघांना धोक्याची घंटा!