लंडन येथील वेंबली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या युरो कप २०२० च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला इटलीकडून पराभव पत्करावा लागला. पेनल्टी शूटआउटमध्ये गेलेल्या या सामन्यात इटलीने ३-२ असा विजय मिळवला. यासोबतच इंग्लंडचे पहिले युरो विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, या पराभवानंतर न्यूझीलंडचा काही क्रिकेटपटूंनी इंग्लंडच्या संघाची ट्विट करून चाहत्यांची मजा घेतली.
इंग्लंडला पत्करावा लागला पराभव
इंग्लंड संघाने फुटबॉल विश्वातील दुसरी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या युरो कपच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केला होता. लंडन येथील वेंबली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंड दुसऱ्या मिनिटाला आघाडी घेतली होती. मात्र, इटलीने दुसऱ्या सत्रामध्ये बरोबरी साधली. त्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये गेलेल्या या सामन्यात इंग्लंडला इटलीने ३-२ असे पराभूत केले. प्रत्येकी पाच पेनल्टीपैकी इटलीने तीन तर, इंग्लंडने दोन पेनल्टी सत्कारणी लावल्या.
न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घेतली मजा
इंग्लंडच्या या पराभवानंतर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू व समालोचक स्कॉट स्टायरिश याने ट्विट करताना म्हटले, ‘मला हे समजले नाही. इंग्लंडने जास्त कॉर्नर मिळवले होते. तेच खरे विजेते होते.’
I don't understand…. England had more corners …. they are the champions! #Stillsalty
— Scott Styris (@scottbstyris) July 11, 2021
तसेच, न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशाम याने देखील अशाच आशयाचे ट्विट करत लिहिले, ‘पेनल्टी शूट आउट कशासाठी घेतला? सर्वाधिक पास देणाऱ्या संघाला विजेतेपद द्यायला हवे होते ना?’
Why is it a penalty shootout and not just whoever made the most passes wins? 👀 #joking 😂
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) July 11, 2021
याव्यतिरिक्त अनेक चाहत्यांनी देखील इंग्लंड संघाला ट्रोल केले.
हे होते कारण
न्यूझीलंड क्रिकेट संघाला २०१९ वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या हातून पराभव पत्करावा लागला होता. सुपर ओवर बरोबरीत सुटल्यानंतर सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या संघाला या सामन्यात विजयी घोषित केले होते. या निर्णयावर त्यावेळी खूप टीका झाली होती. विश्वचषकासारख्या स्पर्धेचा निकाल असा लागावा, हे दुर्दैवी असल्याचे सर्वांनी म्हटले होते. तसेच, या सामन्यातील पंचांचे काही निर्णय देखील वादग्रस्त राहिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट केल्यास भारतीय खेळाडू होणार कोट्यधीश, महाराष्ट्र सरकार देणार इतके बक्षीस
ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव, ‘या’ स्पर्धेतील दोन सामन्यांना मुकणार