उद्या (२२ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शारजाह येथे आयपीएल २०२०चा तिसरा सामना रंगणार आहे. परंतु या सामन्यापुर्वी राजस्थान संघाला एकापाठोपाठ २ मोठे झटके बसले आहेत. इंग्लंडचा धुरंदर खेळाडू जोस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे या सामन्यात खेळणार नाहीत. Jos Buttler And Steve Smith Will Never Play Against CSK Match
स्वत: बटलरने रविवारी खुलासा केला की, युएईत क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार असल्यामुळे तो चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उपलब्ध राहू शकणार नाही. या आक्रमक फलंदाजाने इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान चाहत्यांशी बोलताना सांगितले की,
“चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मी उपलब्ध नसेल. सध्या मी कुटुंबासोबत विलगीकरण कक्षात आहे. मी राजस्थान व्यवस्थापनाचे आभार मानतो की, त्यांनी मला माझ्या परिवाराला सोबत आणण्याची परवानगी दिली.”
याव्यतिरिक्त संघाचा कर्णधार स्मिथला काही दिवसांपुर्वी मॅनचेस्टर येथे नेट्समध्ये सराव करताना डोक्यावर दुखापत झाली होती. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका खेळू शकला नव्हता. त्याची ही दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नाहीये. त्यामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांसाठीही उपलब्ध राहु शकणार नाही.
२०१८ मध्ये पहिल्यांदा राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी झाल्यापासून बटलर राजस्थानचा प्रमुख खेळाडू आहे. त्याने २०१८ मध्ये ५४८ तर २०१९ मध्ये ३११ धावा काढत राजस्थानला अनेक सामने एकहाती जिंकून दिले होते. तर स्मिथनेही गतवर्षी राजस्थानसाठी दमदार प्रदर्शन केले होते. त्याने पूर्ण हंगामात १२ सामने खेळत ३१९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या नाबाद ७३ या सर्वाधिक धावसंख्येचा समावेश होता.
त्यामुळे आता बटलर आणि स्मिथची जागा कोणता खेळाडू घेईल आणि त्यांच्याव्यतिरिक्त संघाचे प्रदर्शन कसे असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा
अशा पद्धतीने खेळाडूंना बाद न करण्याची रिकी पाँटिंगने दिली होती ‘या’ खेळाडूला ताकीद
ट्रेंडिंग लेख –
१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?
आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून
मुंबई इंडियन्स संघात असूनही कधीच खेळण्याची संधी न मिळालेले ६ स्टार खेळाडू