भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथॅम्प्टन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (१८ जून) रोजी सुरु झाला आहे. सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर पाचव्या दिवसाखेर भारतीय संघ ३२ धावांची आघाडीवर आहे. तत्पुर्वी न्यूझीलंड संघ त्यांच्या पहिल्या डावात केवळ २४९ धावांवर बाद झाला आहे. दरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने अतिशय हळूवार फलंदाजी केली. त्यामुले तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
वास्तविक, केन विलियम्सन तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने साऊथॅम्प्टनमधील प्रतिकूल परिस्थितीशी पूर्णपणे जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो अत्यंत संथ फलंदाजी करताना दिसला. विलियम्सन तब्बल १७७ चेंडूत फक्त ४९ धावांवर बाद झाला. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या अतिशय धिम्या खेळीवर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवले. त्याचवेळी माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही त्याची थट्टा केली आहे.
Follow @14YearOfHitman for more.
— Mohit (@MohitRohitian) June 23, 2021
#WTC21final
Abtoh out hojao Williamson uncle pic.twitter.com/n1Ta7N1CNS— Sudhanshu Ranjan Singh (@memegineers_) June 22, 2021
#WTC21final
You go Williamson 200 balls 🥳 pic.twitter.com/rhD0ov542S— Shivani (@meme_ki_diwani) June 22, 2021
केन विलियम्सनची फलंदाजी जरी संथ गतीने झाली असली तरीही या वेळात त्याने भारतीय गोलंदाजांना बरेच थकवले होते. एका टोकाला विकेट घसरत असताना, दुसर्या टोकाला तो भक्कमपणे उभा होता. अखेर त्याला ८३.६ षटकात इशांत शर्माने बाद केले.
या सामन्यातील पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्याचबरोबर पाचव्या दिवसाचा खेळही खराब हवामानामुळे तासाभरानंतर सुरू झाला. आता हा सामना राखीव दिवशी अर्थातच २३ जून रोजी खेळला जाईल. त्यामुळे आता या सामन्याचा अंतिम निकाल लागण्याच्या आशा दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
शुबमन-रोहितची विकेट टीम साउथीसाठी ठरली ‘विक्रमी’, घातली मोठ्या किर्तीमानाला गवसणी
नादच खुळा! विराटने आयसीसीच्या स्पर्धांच्या फायनलमध्ये केलेत सचिन-पॉटींगपेक्षाही मोठे विक्रम
बापरे! एका इंस्टाग्राम पोस्टमधून भारतीय क्रिकेटपटू कमावतात बक्कळ पैसा; रोहित घेतो ४२ लाख, तर विराट…