एमएस धोनी भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मायकल बेवनने धोनीच्या कौतुकात एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे, जी चांगलीच व्हायरल झाली आहे.
मायकल बेवन (Micheal Bevan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एख पोस्टर दिसत आहे, ज्यामध्ये एमएस धोनी (MS Dhoni) लगापाठ १० वर्ष आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये सहभागी असल्याचे समजते. धोनी अशी कामगिरी करणारा एकमात्र भारतीय खेळाडू असल्याचेही आणि तो एक अप्रतिम फिनिशर असल्याचे मायकलने या पोस्टमधून सांगितले आहे.
मायकल बेवनने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “धोनी एक अप्रतिम फिनिशर होता. या दर्जाचा खेळाडू बनण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या चांगल्यामध्ये खूप साऱ्या कलांचे समीकरण असणे गरजेचे असते. या सर्व गोष्टीपैकी सर्वात महत्वाची आहे ती, रणनीती. प्रत्येक परिस्थितीत तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या शॉट्सपैकी सर्वोत्तम शॉट निवडणे, हे तुमच्या संघाला सामना जिंकवून देण्यासाठी मदतीचे ठरते.”
https://www.instagram.com/p/Ce9YL2QuZw-/?utm_source=ig_web_copy_link
एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर अप्रतिम राहिली आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३५० एकदिवसीय सामने खेळले आणि यापैकी २९४ सामन्यांमध्ये प्रत्यक्षपणे फलंदाजी करण्याचा योग त्याला आला. यादरम्याने त्याने ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या. यादरम्यान धोनीचा स्ट्राईक रेट ८७.५६ राहिला आहे. एकदिवसीय कारकिर्दीत धोनीने एकूण १० शतके, तर ७३ अर्धशतके ठोकली.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत भरतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. धोनी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ व्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आणि चौथ्या कर्मांकावर राहुल द्रविड आहे. एकंदरीत पाहता धोनी भारताच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक नक्कीच आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफी २०२१-२२। मुंबईचे खेळाडू सगळीकडे गाजतायत, पाहा आकडेवारी
‘भारतासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हा खेळाडू योग्य’, झहीर खानने सांगितले कारण