इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जात आहे. रविवारी (दि. २९ मे) नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे खेळला जात असलेल्या या सामन्यात राजस्थान संघाने खूपच खराब सुरुवात केली. राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत फक्त १३० धावा चोपल्या आहेत. मात्र, इतक्या कमी धावांचे आव्हान उभे करूनही राजस्थानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ या आव्हानाचा बचाव करू शकतो. कारण, यापूर्वी आयपीएल २०१७चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघात खेळला गेला होता. या सामन्यात मुंबई संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त १२९ धावा चोपल्या होत्या. विशेष म्हणजे, मुंबईने दिलेल्या या आव्हानाचा यशस्वीरीत्या बचावही केला होता. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्स संघदेखील गुजरातला दिलेल्या १३० धावांच्या आव्हानाचा बचाव करू शकतो.
विशेष म्हणजे, मागील ४ वेळी जेव्हा आव्हान १५० किंवा त्यापेक्षाही कमी होते, तेव्हा या आव्हानाचा पाठलाग करणारे संघ अंतिम सामन्यात पराभूत झाले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम
फक्त पंड्या अन् ‘या’ भारतीय कर्णधाराला जमलाय IPL Finalमध्ये विकेट घेण्याची किमया, वाचा सविस्तर
कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला